ETV Bharat / bharat

Mann Ki Baat : 'G-20' कार्यक्रमानं भारतीयांचा आनंद द्विगुणित केला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे आज भारतातील जनतेला संबोधित केलं. 'मन की बात' कार्यक्रमाचा आजचा 105 वा भाग होता. वेगवेगळ्या विषयांवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी भाष्य करत असतात. आज 'G-20' च्या आयोजनावरुन मोदींनी भाष्य केलं. तसेच पर्यटन आणि रोजगार यावरही त्यांनी मत मांडलं.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 8:42 AM IST

Updated : Sep 24, 2023, 12:53 PM IST

नवी दिल्ली : Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित करतात. हा कार्यक्रम प्रथम हिंदीमध्ये प्रसारित केला जातो आणि नंतर लवकरच तो प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जातो. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान विविध विषयांवर भाष्य करत असतात. आज (24 सप्टेंबर) झालेल्या कार्यक्रमात मोदींनी 'G20' परिषद आयोजनावरुन भारतीयांचं कौतुक केलं. तसेच 'G20' च्या आयोजनामुळं भारतीयांचा आनंद द्विगुणीत झाल्याचंही ते म्हणाले.

  • India showcased its leadership by making the African Union a full member of G20 bloc.

    The India-Middle East-Europe Economic Corridor proposed during the Summit is also set to become a cornerstone of global trade for times to come. #MannKiBaat pic.twitter.com/4pvCJW8g0l

    — PMO India (@PMOIndia) September 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

G-20 कार्यक्रमानं भारतीयाचा आनंद द्विगुणित : 'चंद्रयान-3' च्या यशानंतर, G-20 च्या भव्य कार्यक्रमानं प्रत्येक भारतीयाचा आनंद द्विगुणित केलाय. या शिखर परिषदेत भारतानं आफ्रिकन युनियनला G-20 चा पूर्ण सदस्य बनवून आपलं नेतृत्व सिद्ध केलंय. त्यामुळं ही शिखर परिषद भारतीयांसाठी महत्वाची होती व ती यशस्वी करण्यात आली. शिखर परिषदेदरम्यान प्रस्तावित केलेला भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर शेकडो वर्षांसाठी जागतिक व्यापाराचा आधार बनेल, असं प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून केलं.

G20 युनिव्हर्सिटी कनेक्ट प्रोग्राम : पंतप्रधान मोदी म्हणाले की, जी-20 कार्यक्रमाशी भारतीय तरुण कशा प्रकारे जोडले जातात यावर चर्चा करणं महत्त्वाचं आहे. वर्षभरात देशातील विविध विद्यापीठांमध्ये G20 शी संबंधित कार्यक्रम झाले. यात आता दिल्लीत आणखी एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, ज्याचं नाव आहे 'G20 University Connect Programme'. याद्वारे देशभरातील लाखो विद्यापीठातील विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील. यामध्ये आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालयांसह अनेक प्रतिष्ठित संस्था सहभागी होणार आहेत. 26 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

जर्मनीच्या कासमीचा उल्लेख : 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे. काही लोक पर्यटनाकडं केवळं प्रेक्षणीय स्थळ म्हणून पाहतात, परंतु पर्यटनाचा एक खूप मोठा पैलू रोजगाराशी संबंधित आहे. तुम्ही कुठेही प्रवास करण्याचा विचार कराल तेव्हा भारतातील विविधता पाहण्याचा प्रयत्न करा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना केलीय. तसेच जर्मनीची रहिवासी असलेल्या 21 वर्षीय कासमीचाही उल्लेख यावेळी पंतप्रधानांनी केला. मोदी म्हणाले की, 21 वर्षीय कासमी सध्या इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. जर्मनीत राहणाऱ्या कासमी या कधीही भारतात आल्या नाहीत. पण, त्या भारतीय संगीताच्या चाहत्या आहेत. भारतीय संगीतातील त्यांची आवड खूपच प्रभावी आहे.

  • Youth in Nainital district have started a unique ‘Ghoda Library’ for children.

    Books are reaching children even in the most remote areas and not only this, the service is absolutely free. #MannKiBaat pic.twitter.com/2SvBII0vb4

घोडा लायब्ररीचा उल्लेख : नैनिताल जिल्ह्यातील काही तरुणांनी मुलांसाठी एक अनोखी घोडा लायब्ररी सुरू केली आहे. या लायब्ररीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे अगदी दुर्गम भागातील मुलांपर्यंत पुस्तकं पोहोचवणं हे आहे. एवढेच नाही तर ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. आतापर्यंत नैनितालमधील 12 गावं याद्वारे समाविष्ट करण्यात आली आहेत. या लायब्ररीबाबत उल्लेखही पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून केलाय.

आज झाला 105 वा एपिसोड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ११ वाजता 'ऑल इंडिया रेडिओ'वर 'मन की बात' कार्यक्रम केला. या कार्यक्रमातून त्यांनी देश-विदेशातील लोकांसमोर आपले विचार मांडले. 'मन की बात' कार्यक्रमाचा हा 105 वा भाग होता. पंतप्रधान मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित करतात. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या संपूर्ण नेटवर्कद्वारे थेट प्रक्षेपित केला जातो.

2014 पासून 'मन की बात' सुरू : 'मन की बात' हा कार्यक्रम आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर प्रसारित होतो. 'मन की बात' कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन न्यूज, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील थेट प्रसारित केला जातो. हा कार्यक्रम प्रथम हिंदीमध्ये प्रसारित केला जातो आणि नंतर लवकरच तो प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जातो. 3 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा 'मन की बात' कार्यक्रम केला होता. तेव्हापासून हा कार्यक्रम सुरू आहे.

हेही वाचा -

  1. Youth Jump In PM Convoy : सुरक्षेत मोठी चूक; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात घुसला तरुण, पोलिसांचा हलगर्जीपणा नडला
  2. PM Modi Visit Varanasi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी

Last Updated : Sep 24, 2023, 12:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.