नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार असून १९ ऑक्टोबरला दोन दिवसांनी पक्षाला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम काँग्रेसमध्ये विरोधाचा आवाज उठू लागला आहे. मतदान प्रतिनिधींची यादी सार्वजनिक करण्याची मागणी ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी केली आहे. यावरून त्यांनी निवडणुकीच्या निःष्पक्षेतवरच प्रश्न उपस्थित Manish Tewaris question to Congress President केले आहेत. यापूर्वी आनंद शर्मा यांनीही CWC बैठकीत मतदार यादीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
-
1/1 With great respect @MD_Mistry ji How can there be a fair & free election without a publicly available electoral roll ? Essence of a fair & free process is the names & addresses of the electors must be published on @INCIndia website in a transparent https://t.co/7lRqSwqseV
— Manish Tewari (@ManishTewari) August 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">1/1 With great respect @MD_Mistry ji How can there be a fair & free election without a publicly available electoral roll ? Essence of a fair & free process is the names & addresses of the electors must be published on @INCIndia website in a transparent https://t.co/7lRqSwqseV
— Manish Tewari (@ManishTewari) August 31, 20221/1 With great respect @MD_Mistry ji How can there be a fair & free election without a publicly available electoral roll ? Essence of a fair & free process is the names & addresses of the electors must be published on @INCIndia website in a transparent https://t.co/7lRqSwqseV
— Manish Tewari (@ManishTewari) August 31, 2022
काँग्रेसमधील 'जी-23'चे सदस्य मनीष तिवारी यांनी संघटनेचे निवडणूक प्रभारी मधुसूदन मिस्त्री यांना विचारले आहे की, मतदार यादी सार्वजनिक केल्याशिवाय निष्पक्ष निवडणूक कशी होणार? तिवारी म्हणाले की, क्लब निवडणुकीतही असे होत नाही! यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला - काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जवळपास ९ हजार मतदार आहेत. मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, मतदारांची यादी प्रदेश काँग्रेस कार्यालयात असून ती यादी प्रतिस्पर्धी उमेदवारांना देण्यात येणार आहे. पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी राज्यांमध्ये भटकंती करावी लागेल का, असा सवाल तिवारी यांनी केला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रस्तावक मतदार नसल्याची सबब सांगून उमेदवाराचा अर्ज रद्द होऊ शकतो, अशी भीतीही तिवारी यांनी व्यक्त केली आहे. अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी दहा प्रस्तावकांची गरज आहे.
काँग्रेसचे बंडखोर गटाध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असल्याचे तिवारी यांच्या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे. शशी थरूर यांनी एक दिवसापूर्वी इशारे दिले होते आणि आता मनीष तिवारी उघड्यावर आले आहेत. G23 चे तीन नेते आनंद शर्मा, भूपेंद्र हुडा आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी काल संध्याकाळी काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली.
हेही वाचा काँग्रेसला लवकरच मिळणार पूर्णवेळ अध्यक्ष