ETV Bharat / bharat

Manipur video : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव, एन बिरेन सिंह म्हणतात..

author img

By

Published : Jul 21, 2023, 9:06 PM IST

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असताना महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ४ मे रोजीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढला आहे.

MANIPUR CM N BIREN SINGH
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये 3 मे पासून हिंसाचार सुरू आहे. नुकताच 4 मे चा महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विरोधक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. विरोधकांच्या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले की, 'राज्यात शांतता प्रस्थापित करणे' हे त्यांचे मुख्य काम आहे. ते म्हणाले की '...मला त्याच्या राजकारणात जायचे नाही. राज्यात शांतता प्रस्थापित करणे हे माझे काम आहे. प्रत्येक समाजात उपद्रवी घटक असतात, पण आम्ही त्यांना सोडणार नाही'.

  • #WATCH | When asked to respond on calls for his resignation over the law and order situation in Manipur, CM N Biren Singh says, "I don't want to go into this. My job is to bring peace to the state. Miscreants are there in every society but we will not spare them." pic.twitter.com/gD7ci42GIw

    — ANI (@ANI) July 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'मुख्यमंत्र्यांचा अजब तर्क' : मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले की, 'या घटनेचा राज्यभरात लोक निषेध करत आहेत. ते आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. काल अटक करण्यात आलेल्या आरोपीचे घर काही महिलांनी जाळले होते. मणिपूरी समाज महिलांवरील गुन्ह्याच्या विरोधात आहे. ते महिलांना माता मानतात. आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी सरकारला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन आहे', असे त्यांचे म्हणणे आहे.

  • #WATCH | Manipur CM N Biren Singh says, "People are protesting across the state regarding the incident and demanding the strictest punishment for the accused. Accused number one, who was arrested earlier, his house was burnt by women yesterday. Manipur society is against crime… pic.twitter.com/cLRohAUbvf

महिला आयोगाच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया : या घटनेवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले की, त्यांना जूनमध्ये अनेक तक्रारी मिळाल्या होत्या आणि त्यांनी त्या राज्य प्रशासनाकडे कारवाईसाठी पाठवल्या होत्या. मात्र सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओवर महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा म्हणाल्या की, 'आम्ही मणिपूर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. मणिपूर सरकारला यावर स्पष्टीकरण द्यावे लागेल'. रेखा शर्मा यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना फोन केल्याचा खुलासाही केला आहे.

  • Manipur | The main culprit who was wearing a green t-shirt and seen holding the woman was arrested today morning in an operation after proper identification. His name is Huirem Herodas Meitei (32 years) of Pechi Awang Leikai: Govt Sources

    (Pic 1: Screengrab from viral video, Pic… pic.twitter.com/e5NJeg0Y2I

    — ANI (@ANI) July 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महिलांना पोलीस कोठडीतून हिसकावून नेले : 18 मे रोजी दिलेल्या पोलिस तक्रारीत पीडितांनी आरोप केला आहे की, दोन महिलांपैकी लहान मुलीवर 'दिवसाढवळ्या क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला'. जेव्हा त्यांच्या गावावर हल्ला झाला तेव्हा या महिला तेथून पळून जात होत्या. पोलीस त्यांची सुटका करून ठाण्यात नेत असताना जमावाने त्यांना अडवून पोलीस कोठडीतून हिसकावून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तरुणीचे वडील आणि भावाला जमावाने पकडले. फिर्यादीनुसार, त्यांच्या भावाचा खून करण्यात आला आहे. हा 19 वर्षीय तरुण आपल्या बहिणीला जमावापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता.

  • #WATCH | On Manipur viral video and NCW's letter to the state authority, Commission's chief Rekha Sharma says, "...We are in touch with the officers from Manipur...Not one specific but there were many complaints and that too from people outside India and outside Manipur. Firstly,… pic.twitter.com/KZUH4ZmgfV

जमावाने मुख्य आरोपीचे घर जाळले : या प्रकरणी मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. मणिपूर पोलिसांनी ट्विट केले, 'व्हायरल व्हिडिओ प्रकरणात चार मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. थौबल जिल्ह्यात अपहरण आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील आणखी 3 मुख्य आरोपींना आज अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 4 जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे महिलांच्या जमावाने मुख्य आरोपीचे घर जाळले आहे. गुरुवारी संध्याकाळी उशिरा थौबल जिल्ह्यातील याईरीपोक गावात महिलांच्या जमावाने हुइरेम हेरोदास सिंह (मेईतेई) याच्या घराला आग लावली.

हेही वाचा :

  1. Manipur Women Parade : मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढण्यापूर्वी जमावाने लोकांची घरे जाळली, अनेकांना मारले ठार; एफआयआरमध्ये नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.