बंगळूरू (कर्नाटक) - पत्नीला मित्रांसोबत शारीरिक सबंध प्रस्तापित करण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या पतीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकमधील बंगळूरु येथील बीएमटी ले-आऊट परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे.
आरोपी वसीम शरीफ याचे जानेवारी 2018 मध्ये पीडितेसोबत लग्न झाले. काही दिवसानंतर हे दोघेही गोव्याला गेले होते. त्याठिकाणी वसीमने पत्नीला दारू पिण्यासाठी त्रास दिला. मात्र तीने नकार दिल्याने त्याने मारहाण केली. त्यानंतर दोघेही बंगळूरुला परतले. वसीम मित्रांसोबत घरी नेहमीच पार्ट्यां करत होता. मित्रांना दारू वाटप करण्यासाठी तो पत्नीला सांगत होता. सोबतच शारीरिक सबंध प्रस्तापित करण्यासाठीही त्रास देत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दोनदा केला गर्भपात -
पीडितेचा दोनवेळा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला. मात्र तिसऱ्या वेळेस गर्भपात न झाल्याने तीने मुलीला जन्म दिला. त्यानंतर मुलीचे डोळे निळे असल्याच्या कारणावरून त्याने पत्नीला घरातून बाहेर काढले. पीडितेने पतीच्या त्रासाला कंटाळून घटनेची माहिती महिला पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या चार मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे.