बेळगाव : एका वडिलांनी सभापती आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बेळगावातील विधानसभा भाड्याने देण्याची विनंती केली आहे. (Karnataka assembly for rent to celebrate birthday) हे पत्र गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथील रहिवासी आणि वकील मल्लिकार्जुन चौकशी यांनी लिहिले आहे. (letter asking Karnataka assembly for rent).
काय आहे पत्रात ? : "माझी एकुलती एक मुलगी मनीश्री 30 जानेवारीला 5 वर्षांची होणार आहे. तिला पहिल्या वर्गात प्रवेश घ्यायचा आहे. हा तिच्या आयुष्यातील अनमोल क्षण आहे. त्यामुळे तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मी बेळगावातील कर्नाटक विधानसभा एका दिवसासाठी भाड्याने देण्याची विनंती केली आहे", असे या पत्रात लिहिले आहे.
विधानसभा भाड्याने दिल्याने बोजा कमी होईल : "बेळगावची सुवर्णसौध विधानसभा दरवर्षी केवळ हिवाळी अधिवेशनासाठीच वापरली जाते. अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांनी शासकीय कार्यालये स्थलांतरित करण्यास सांगूनही काही उपयोग झाला नाही. दहा दिवसांच्या अधिवेशनावर सरकार करोडो रुपये खर्च करते. त्यामुळे हा खर्च भागवण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम भाड्याने दिल्याने सरकारवर बोजा पडणारा आर्थिक व्यवस्थापन खर्च वाचू शकतो. अधिवेशन सुरू असून या विषयावर सभागृहात चर्चा करून भाडे अदा करण्यात यावे", असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.