नवी दिल्ली - दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी ऑक्सिजनचा कमी पुरवठा होत असल्याने अभूतपूर्व संकट उद्भवले आहे. दिल्ली सरकारकडून बेस रुग्णालयाला ऑक्सिजनचा कमी पुरवठा होत असल्याची तक्रार सैन्यदलाने केंद्र सरकारकडे केली आहे.
सैन्यदलाच्या माहितीनुसार बेस रुग्णालयाला 3.4 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. मात्र, दिल्ली सरकारने सोमवारी केवळ 1 मेट्रिक टन ऑक्सिजन दिला आहे. तर मंगळवारी दिल्ली सरकारने केवळ 0.4 मेट्रिक टन ऑक्सिजनची तरतूद केली आहे. या प्रकरणाची माहिती संरक्षण दलाला कळविण्यात आल्याचे वरिष्ठ सैन्यदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. आवश्यकतेप्रमाणे ऑक्सिजनची तरतूद करण्यात आलेली नाही. आम्ही सरकारबरोबर हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
हेही वाचा-लसीकरणासाठी प्रत्येक वयोगटासाठी वेगळी रांग करून वरिष्ठांचा मनस्ताप टाळावा, भाजपाची मागणी
सैन्यदलाच्या वेस्टर्न कमांडनेही सर्वांना संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. कोरोनाच्या काळात सैन्यदलाच्या रुग्णालयाचा विस्तार करण्यात आला आहे. मात्र, ऑक्सिजनचा कमी पुरवठा होत असल्याने कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात अडथळा येणार असल्याचे सूत्राने सांगितले आहे.
हेही वाचा-सरकारने नवी ऑर्डर दिली नसल्याची माहिती चुकीची; पुढच्या खेपेत ११ कोटी डोस मिळणार - अदर पुनावाला
रुग्णालयांची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न-
कर्नल अमन आनंद म्हणाले, की बेस रुग्णालयात सैन्यदलाच्या रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी 340 बेड्स आहेत. तर त्यापैकी 250 बेडसाठी ऑक्सिजनची सुविधा आहे. कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने रुग्णालयाच्या क्षमतांमध्ये वाढ करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा रुग्णालयात रुग्ण आहेत. तर काही कोरोनाबाधितांवर ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. रुग्णालयात आयसीयू बेडची क्षमता 30 एप्रिलपर्यंत 12 वरून 35 वर करण्यात आली आहे. जून 2021 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ऑक्सिजन बेडची क्षमता ही 900 बेडपर्यंत करण्याचे प्रयत्न असल्याचेही कर्नल अमन आनंद यांनी सांगितले.