ETV Bharat / bharat

NEET UG 2023 : NEET UG 2023 OMR Sheets स्कॅन कॉपी अन् आन्सर की कशाप्रकारे करणार डाऊनलोड, जाणून घ्या - ओएमआर शीट स्कॅन विद्यार्थ्यांना मेल

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET UG 2023 उमेदवारांच्या OMR शीटची स्कॅन कॉपी नोंदणीकृत मेल आयडीवर पाठवण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटे ४ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना हे मेल मिळण्यास सुरुवात झाली आहे. या परीक्षेला 20 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या प्रकरणात, त्यांना हे मेल आज रात्री किंवा उद्या सकाळी मिळतील.

NEET UG 2023
NEET UG 2023
author img

By

Published : Jun 5, 2023, 12:14 PM IST

Updated : Jun 5, 2023, 1:19 PM IST

कोटा : देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षेविषयी (NEET UG 2023) मोठी अपडेट समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यार्थ्यांच्या ओएमआर शीटची स्कॅन कॉपी मेलवर पाठवणे सुरू केले आहे. आज 4 वाजेपासून हे मेल विद्यार्थ्यांना मिळू लागतील. या परीक्षेला 20 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. काही विद्यार्थ्यांना हे मेल आज रात्री किंवा उद्या सकाळी मिळतील.

विद्यार्थ्यांसाठी सूचना : कोटाच्या खासगी कोचिंग संस्थेचे करिअर समुपदेशन तज्ञ पारिजात मिश्रा म्हणाले की त्यांनी आजपासून विद्यार्थ्यांना स्कॅन कॉपी पाठवण्यास सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया एक-दोन दिवस सुरू राहणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेले ईमेल आयडी तपासावेत. ज्या विद्यार्थ्यांना हा मेल मिळाला नसेल त्यांनी थोडी वाट पाहावी. कारण एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना मेल करणे राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीला शक्य नसेल. काही-काही वेळात विद्यार्थ्यांना स्कॅन कॉपी मिळत राहील, असा सल्ला मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना दिला. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीमार्फत आयोजित करण्यात आलेली नीट यूजी 2023 परीक्षेसाठी 20 लाख 89 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील साधरण 97 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे, म्हणजेच साधरण 20 लाख 25 हजार परीक्षार्थी होते.

लवकरच मिळेल रेकॉर्ड रिस्पांस शीट आणि उत्तरपत्रिका : राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने स्कॅन कॉपी जाहीर केल्या आहेत. आता त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याचे रेकॉर्ड रिस्पांस शीट दिली जाईल. विद्यार्थी स्कॅन कॉपी आणि रेकॉर्ड रिस्पांस शीटची जुळवणूक करू शकतील. जर यात काही तफावत असेल तर विद्यार्थी आपली तक्रार दाखल करू शकतात. दुसरीकडे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी प्रश्नपत्रिका आणि उत्तर की देखील जारी करेल. उमेदवारांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवरही आक्षेप नोंदवता येतील. येत्या ४ ते ५ दिवसांत हे सर्व जाहीर केले जाईल, असे तज्ज्ञ पारिजात मिश्रा यांनी सांगितले.

मणिपूरमध्ये ६ जून रोजी होणार परीक्षा : मणिपूरमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे तेथे ७ मे रोजी होणारी NEET UG 2023 ची परीक्षा रद्द करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा पुढे ढकलली होती. ही परीक्षा 3 ते 5 जून दरम्यान होणार असल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली होती, मात्र या परीक्षेची तारीख आता जाहीर झाली आहे. नीट यूजी 2023 ची परीक्षा ६ जून रोजी घेण्यात येत आहे. पारिजात मिश्रा यांनी सांगितले की, यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याआधी विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्राची माहिती घेतली होती, त्यानंतर केंद्रातूनच विद्यार्थ्यांना बोलावून हाताने बनवलेले प्रवेशपत्र देण्यात आले. त्या आधारावर ही परीक्षा ६ जून रोजी घेण्यात येत आहे.

कशाप्रकारे डाऊनलोड करणार NEET UG 2023 OMR Sheets आणि आन्सर की

  • यासाठी तुम्हाला आधी अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in जावे लागेल.
  • होमपेजवर असलेल्या 'Candidate Login' वर क्लिक करा.
  • त्यानंतर नवीन पेज उघडेल. त्यात तुमचा अप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख टाका.
  • मग तुमची ओएमआर OMR रिपॉन्स शीट आणि आन्सर की दिसेल.
  • त्यानंतर हे ओएमआर आणि की डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

हेही वाचा -

  1. UPSC Success Story : संसाराचा गाडा पाठीशी असताना पोलीस अधिकाऱ्याच्या सूनबाईचं युपीएससीत यश
  2. Neet Exam : धक्कादायक प्रकार; परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना परिधान करायला लावले उलटे अंतर्वस्त्र

Last Updated : Jun 5, 2023, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.