मुंबई : क्रिप्टोकरन्सी ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे. ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो, त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. ही एक इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, ज्याद्वारे आपण इंटरनेटवरून नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते. आजचे बीटकॉईनचे दर जाणून घ्या.
क्रिप्टोकरन्सी दर : आज बिटकॉइनची किंमत 13,72,492 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 99,128 रूपये आहे. बायनान्सची किंमत 20,170 रूपये आहे.
काय आहे क्रिप्टो चलन : क्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन ( what is Cryptocurrency) आहे. ते अस्थिर असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम असते. विशेषत: क्रिप्टो चलनाच्या किमतीमधील प्रचंड चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांसाठी तीव्र जोखीम असते. इनक्रिप्ट तंत्रज्ञानाच्या डिजीटल एककामधून क्रिप्टोचा व्यापार केला जातो. हे चलन स्वतंत्रपणे मध्यवर्ती बँकेकडून चालविण्यात ( Cryptocurrency Prices 2 January 2023 )येते.
1. बीटकॉईन : हे विकेंद्रित डिजिटल चलन आहे. हे पहिले विकेंद्रित डिजिटल चलन आहे. ज्याचा अर्थ ते कोणत्याही मध्यवर्ती बँकेद्वारे शासित नाही. हे संगणक नेटवर्किंगवर आधारित पेमेंटसाठी डिझाइन केलेले (Cryptocurrency Prices Today in India) आहे. बिटकॉइनचे मूल्य अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यापैकी दोन सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागणी आणि पुरवठा होय.
2. लिटकॉइन (Litecoin) : बिटकॉइनला पर्याय म्हणून लिटकॉइन लॉन्च करण्यात आले. बिटकॉइनला पर्याय म्हणून लिटकॉईन २०११ मध्ये लाँच केले होते. इतर क्रिप्टोकरन्सीं प्रमाणेच लिटकॉइन हे एक ओपेन स्त्रोत आहे, ग्लोबल पेमेंट नेटवर्क आहे जे पूर्णपणे विकेंद्रित आहे, म्हणजे सरकारचे कोणतेही केंद्रीय अधिकारी नाहीत. लिटकॉइन एक पीअर-टू-पीअर क्रिप्टोकरन्सी आणि मुक्त-स्रोत सॉफ्टवेअर प्रकल्प आहे. चार्ली ली ह्याने लिटकॉइनची निर्मिती केली आहे. चार्ली ली हा गूगल ह्या जगप्रसिद्ध कंपनीत नोकरी करणारा एक कर्मचारी आहे.
3. एथेरियम (Ethereum) : २०१५ मध्ये एथेरियम तयार करण्यात आले. एथेरियम हा एक प्रकारचा क्रिप्टोकर्न्सी आहे. जो ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित मुक्त स्रोत मंच आहे. इतर ब्लॉकचेन्स प्रमाणेच, एथेरियमचे एथेर नावाचे मूळ क्रिप्टोकरन्सी आहे. ईटीएच हे डिजिटल पैसे आहेत. जर बिटकॉइनबद्दल ऐकले तर एथेरियम मध्ये बर्याच वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे पूर्णपणे डिजिटल आहे आणि जगात कोणासही त्वरित पाठवले जाऊ शकते. एथेरियम पुरवठा कोणत्याही सरकार किंवा कंपनीद्वारे नियंत्रित केला जातो. ते विकेंद्रित आहे. जगभरातील लोक एथेरियमचा उपयोग पेमेंट करण्यासाठी केला (Cryptocurrency Prices Today In India ) जातो.