कौशांबी (लखनौ) Kaushambi Rape Victim Murder - उत्तर प्रदेशातील महिला अत्याचारांच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतकेच नाही तर गुन्ह्यातील आरोपीदेखील पुन्हा अत्याचार करत असल्याची घटना समोर आलीय. कौशांबी जिल्ह्यात बलात्कार झालेल्या पीडितेची आरोपींनी कुऱ्हाडीनं निर्दयीपणानं (Rape Victim Murder in Kaushambi) हत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडल्याचं सांगण्यात येत आहे.
कौशांबी जिल्ह्यातील महेवाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराची घटना घडली होती. गावात राहणाऱ्या पवन नावाच्या आरोपीनं तरुणीवर बलात्कार केला होता. या प्रकरणात महेवागाट पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपी पवनची तुरुंगात रवानगी केली होती. आरोपी १५ दिवसानंतर तुरुंगातून जामिनावर सुटला. त्यानंतर आरोपी व त्याचा भाऊ अशोक यांनी पीडित आणि तिच्या नातेवाईकांवर प्रकरण मिटविण्याकरिता दबाव टाकण्यास सुरुवात केली. मात्र, पीडितेनं कोणत्या परिस्थितीत गुन्हा मागे घेण्यास नकार दिला.
ग्रामस्थांनी दाखविली नाही हिंमत- सोमवारी पीडिता शेतात गुरे चारून घरी परतत होती. गावाच्या दिशेनं येणाऱ्या वाटेतच आरोपी अशोक आणि पवन यांनी पीडितेला गाठलं. त्यावेळी दोघांनीही पीडितेवर कुऱ्हाडीचे घावून तिची निर्दयीपणानं हत्या केली. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार हत्या होत असताना एकाही ग्रामस्थांनी पीडितेचे प्राण वाचविण्यासाठी पुढे येत हिंमत दाखविली नाही. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, आरोपी अशोक याच्यावरदेखील हत्येचा यापूर्वी गुन्हा दाखल आहे. तर त्याचा भाऊ पवनची बलात्काराच्या प्रकरणात जामिनावर सुटका झाली.
दोन्ही गटात वाद असल्याचा पोलिसांचा दावा- कौशांबी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बृजेश श्रीवास्तव यांच्या माहितीनुसार महेवाघाट ठाण्याच्या हद्दीत दोन गटात पूर्ववैमनस्य आहे. त्या दोन्ही गटांमध्ये न्यायलयातदेखील वाद सुरू आहे. एका गटातील लोकांनी दुसऱ्या गटातील २० वर्षीय तरुणीवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणात महेवाघाट पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित तरुणीवर गुन्ह्याबाबत तडजोड करण्याकरिता गुंडांनी दबाव निर्माण केला होता. मात्र, पीडितेनं कोणतीही तडजोड करण्याकरिता तयारी दाखविली नाही. त्यानंतर संतापलेल्या आरोपींनी पीडितेची हत्या केली. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास करण्यास सुरुवात केली.
- उत्तर प्रदेशमध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे एन्काउन्टर झाल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. तर कधी अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या घरावून प्रशासनाकडून बुलडोझरदेखील चालवून कारवाई करण्यात आलेली आहे. असे असले तरी उत्तर प्रदेशमधील बलात्काराच्या गुन्ह्याचं प्रमाण कमी झालेलं नसल्यानं उत्तर प्रदेश सरकारची डोकेदुखी वाढली.
हेही वाचा-