बेळगाव(कर्नाटक) : कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाच्या ( Karnataka Maharashtra Borderism ) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ( NCP MLA Rohit Pawar ) यांनी बेळगावला भेट दिली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सूचनेवरून त्यांनी भेट दिल्याचे सांगण्यात येते. रोहित पवार हे पुणे जिल्ह्यातील कर्जत-जामकेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते सोमवारी रात्री कोल्हापूर कुगनोळी मार्गे बेळगावात आल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी बेळगाव तालुक्यातील विविध भागांना भेटी दिल्या.
दोन मंत्र्यांना केली होती बेळगावात येण्यास मनाई - सीमावाद सध्या चिघळला आहे. मागील आठड्यात महाराष्ट्राचे दोन मंत्री बेळगावला जाणार होते. मात्र, कर्नाटकातील सरकारने त्यांना येण्यास बंदी घातली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने हा मंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला होता. आता आमदार रोहित पवार हे बेळगावला गेल्याने पुन्हा नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राचे दोन मंत्री जाऊ शकत नाहीत मात्र एक आमदार बेळगावत जातो, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.
स्थानिक एमईएस कार्यकर्त्यांनी दिला रोहित पवार यांना पाठिंबा : आजारी असलेले एमईएस बेळगाव शहर अध्यक्ष दीपक दळवी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नंतर गोळीबार येथे शहीद झालेल्यांच्या नावाने बांधलेल्या हुतात्मा स्मारकाला भेट दिली. नंतर त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर रोहित पवार यांनी यल्लूर गावातील महाराष्ट्र हायस्कूलला भेट दिली. स्थानिक एमईएस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना पाठिंबा दिला. पवार मंगळवारी सकाळी महाराष्ट्रात परतले. रोहित पवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भावाचा मुलगा आहे.
सीमावर्ती गावांचा काय आहे प्रश्न - महाराष्ट्राला गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या राज्यांची सीमा लागून आहे. मात्र, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी गावात सीमेलगतच्या अनेक गावांमध्ये अद्यापही विकास झालेला नाही. महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने मिळतात. महसुली कामकाजाच्या सुविधासुद्धा अधिक सोयीस्कर आहेत. (What is borderism of Maharashtra Karnataka) त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांनी म्हैसाळ पाणी योजनेचे पाणी आम्हाला देण्यात यावे अन्यथा कर्नाटकमधील अलमट्टी धरणाचे पाणी देण्यासाठी कर्नाटकवर दबाव निर्माण करावा जर तेही शक्य नसेल, तर आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. या गावांवर कोणताही भाषिक अन्याय नाही. मात्र, स्थानिक पाणीटंचाईचा प्रश्नावरून आणि विकासावरून ही गावे संतप्त झालेली आहेत.