लखनौ (उत्तर प्रदेश): काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिला ( Kapil Sibal resigns from Congress ) आहे. त्यांनी समाजवादी पक्षाच्या (एसपी) पाठिंब्याने लखनौमध्ये बुधवारी अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला ( Sibbal Files RS Nomination From SP ) आहे. सिब्बल यांनी लखनौमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेशमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सिब्बल हे ४ जुलै रोजी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. "मी १६ मे रोजी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला होता," असे त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगितले. "मी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. देशात स्वतंत्र आवाज असावा अशी माझी नेहमीच इच्छा आहे. विरोधी पक्षात राहून, आम्हाला युती करायची आहे. जेणेकरून आम्ही मोदी सरकारला विरोध करू शकू," असेही ते पुढे म्हणाले.
-
Kapil Sibal resigns from Congress, files Rajya Sabha nomination with SP's support
— ANI Digital (@ani_digital) May 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/f0FrOOj2Fk#KapilSibal #Congress #SamajwadiParty #AkhileshYadav pic.twitter.com/E2Xk0xjjEn
">Kapil Sibal resigns from Congress, files Rajya Sabha nomination with SP's support
— ANI Digital (@ani_digital) May 25, 2022
Read @ANI Story | https://t.co/f0FrOOj2Fk#KapilSibal #Congress #SamajwadiParty #AkhileshYadav pic.twitter.com/E2Xk0xjjEnKapil Sibal resigns from Congress, files Rajya Sabha nomination with SP's support
— ANI Digital (@ani_digital) May 25, 2022
Read @ANI Story | https://t.co/f0FrOOj2Fk#KapilSibal #Congress #SamajwadiParty #AkhileshYadav pic.twitter.com/E2Xk0xjjEn
उत्तर प्रदेश विधानसभेत सपाकडे 111 आमदार असल्याने सिब्बल हे वरच्या सभागृहात निवडून येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सिब्बल यांनी विविध मुद्द्यांवरून काँग्रेस हायकमांडवर टीका केली होती आणि या पदाच्या निवडणुकीसह पक्षात व्यापक सुधारणांची मागणी केली होती. काँग्रेस अध्यक्षांवर सिब्बल यांनी एका मुलाखतीदरम्यान "घर की काँग्रेस" अशी टिप्पणी केली होती. ज्यात त्यांनी असेही म्हटले होते की, पाच राज्यांच्या निवडणुकांमधील निकालांमुळे मला आश्चर्य वाटले नाही आणि नेतृत्वाने पक्षाच्या पुनरुत्थानासाठी योजना आखायला हवी होती. (ANI)