नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड़ ( Jagdeep Dhankhar Wins ) यांची भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली ( new Vice President of India ) आहे. त्यांनी मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला ( Defeat of Margaret Alva ) आहे. धनखड यांना ५०० तर मार्गारेट अल्वा यांना २०० पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत.
देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज ( Vice President Election ) मतदान झाले. एनडीए उमेदवार जगदीप धनखड ( NDA candidate Jagdeep Dhankhad ) व युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा ( UPA candidate Margaret Alva ) यांच्यामध्ये उपराष्ट्रपतीपदासाठी लढत झाली. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनी निवडणुकीत आज मतदान केले.
कोण आहेत जगदीप धनखड : राजस्थानमधून आलेले जगदीप धनखड हे सत्ताधारी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे ( NDA candidate Jagdeep Dhankhad ) उमेदवार आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांचे राजकीय कार्यक्षेत्र राजस्थान असून ते झुंझुनूचे रहिवासी आहेत. लोकसभा आणि राज्यसभेचे अध्यक्ष राजस्थानमधून येण्याची ही पहिलीच वेळ असेल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा येथून खासदार आहेत. तर राज्यसभेत सभापती हे उपराष्ट्रपती असतात.
हेही वाचा : PROFILE OF DHANKHAD:शेतकरी कुटुंबात जन्मलेले धनखड ममता सोबतच्या संघर्षामुळे होते चर्चेत