ETV Bharat / bharat

कोविड १९ चे रुग्ण शोधण्यासाठी सर्वात जास्त चाचण्या घेणारा भारत हा जगातील दुसरा देश - कोरोना आढावा भारत

भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही ८६ लाख ३६ हजार १२ इतकी आहे. यातील १ लाख २७ हजार ५७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ८० लाख १३ हजार ७४८ रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या ४ लाख ९४ हजार ६५७ अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

COVID-19 news
कोरोना आढावा भारत
author img

By

Published : Nov 12, 2020, 5:04 AM IST

हैदराबाद - भारताची कोरोनाविरुद्धची प्रतिक्रिया ही प्रभावी आणि सक्रिय होती. लोकसंख्येला ध्यानात ठेवून भारताने कोविडला लढा दिल्याची प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ब्रिक्सच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत दिली आहे.

तसेच, कोविड १९ चे रुग्ण शोधण्यासाठी सर्वात जास्त चाचण्या घेणारा भारत हा जगातील दुसरा देश आहे. भारताने मंगळवार (१० नोव्हेंबर) सकाळपर्यंत ११.९६ कोटी चाचण्या केल्या असून त्यात अँटिजेन चाचणीची संख्या ४९ टक्के, तर आरटी-पीसीआर चाचणीची संख्या ही ४६ टक्के आहे. असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

कोरोना आढावा भारत
कोरोना रुग्ण संख्या

दरम्यान, भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही ८६ लाख ३६ हजार १२ इतकी आहे. यातील १ लाख २७ हजार ५७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ८० लाख १३ हजार ७४८ रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या ४ लाख ९४ हजार ६५७ अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

मुंबई - राज्यात काल ९ हजार १६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आजपर्यंत एकूण १५ लाख ९७ हजार २५५ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२३ टक्के एवढे झाले आहे. काल राज्यात ४ हजार ९०७ नवीन रुग्णांचे निदान झाले. तसेच, १२५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४५ हजार ५६० रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सार्वजनिक ठिकाणी, नदीकाठी आणि मंदिरांमध्ये यंदा छट पुजेचे आयोजन होऊ देऊ नये, असे निर्देश दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पश्चिम बंगाल - राज्यात उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये होत असलेली गर्दी पाहून डॉक्टर वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. लोकल सेवा सुरू झाल्यानंतर राज्यातील काही रेल्वे स्थानकांवर रेल्वे पकडण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच, रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये गर्दी होती. त्यामुळे, हे सर्व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास पोषक असून ते कोरोनाविरुद्धच्या आतापर्यंतच्या लढ्यात मिळवलेल्या यशाला तडा लावतील, अशी चिंता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

कर्नाटक - गेल्या ८ महिन्यापासून राज्यातील पदवी, तंत्रशिक्षण आणि पदविका विद्यालये बंद आहेत. ते सोमवारपासून (१७ नोव्हेंबर) उघडणार असून, त्यासाठी राज्य सरकारने एका मानक कार्यपद्धतीची (एसओपी) निर्मिती केली आहे.

गुजरात - २३ नोव्हेंबर नंतर राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आले होते.

हिमांचल प्रदेश - कोविड १९ बाबत काय खबरदाऱ्या घेतल्या, याबाबत माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

हेही वाचा- कर्नाटकातील दहशतवाद्याचे बंगाल कनेक्शन; 'हनीट्रॅप'मधल्या तानिया प्रवीणच्या संपर्कात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.