नवी दिल्ली: केद्रिय आरोग्य मंत्रालयाने (Central Ministry of Health) जारी केलेल्या आकडेवारी नुसार गेल्या 24 तासातील 127 मृत्यूंसह मृतांची संख्या 5 लाख 16 हजार 479 वर पोहोचली आहे. एकूण संक्रमणांपैकी ०.०६ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. राष्ट्रीय कोविड रिकव्हरी रेट 98.74 टक्के नोंदवला गेला आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोरोना रुग्णांत 1 हजार 562 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. रोजचा तसेच साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी दर 0.41 टक्के असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
गेल्या 24 तासात एकूण 4 लाख 31 हजार 973 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 78.26 कोटी चाचण्या घेतल्या आहेत. या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 24 लाख 65 हजार 122 वर पोहोचली आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.20 टक्के नोंदवले गेले आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना लसीचे 181.21 कोटींहून अधिक डोस दिले गेले आहेत.
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 7 ऑगस्ट 2020 रोजी 20 लाख, 23 ऑगस्ट रोजी 30 लाख, 5 सप्टेंबर रोजी 40 लाख आणि 16 सप्टेंबर रोजी 50 लाखांवर गेली होती. 28 सप्टेंबर रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर रोजी 70 लाखांवर गेली होती. , 29 ऑक्टोबर रोजी 80 लाख, 20 नोव्हेंबर रोजी 90 लाख आणि 19 डिसेंबर रोजी एक कोटींचा टप्पा ओलांडला. भारताने 4 मे 2021 रोजी दोन कोटी आणि 23 जून रोजी तीन कोटींचा गंभीर टप्पा पार केला होता. देशात आतापर्यंत झालेल्या एकूण 5 लाख 16 हजार 479 मृत्यूंपैकी 1 लाख 43 हजार 766 महाराष्ट्रात, 67 हजार 315 केरळ, 40 हजार 035 कर्नाटक, 38 हजार 025 तामिळनाडू, 26 हजार 146 दिल्ली, 23 हजार 492 उत्तर प्रदेश आणि 21 हजार 419 पश्चिम बंगालमधील आहेत.