मँचेस्टर : सध्या भारत आणि इंग्लंड संघात ( England vs India ODI Series ) तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. त्याचबरोबर ही मालिका आती 1-1 ने बरोबरीत आहे. या मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. हा तिसरा सामना ( IND vs ENG 3rd ODI ) रविवारी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी साडेतीनला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न करताना दिसून येतील.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 10 विकेट्सने धुरळा उडवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्या इंग्लंडने शानदार वचपा काढत भारताला 100 धावांनी पराभूत केले. त्याचबरोबर मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे आज होणार सामना जो संघ जिंकंल, तोच मालिकेचा विजयी संघ ठरेल. अशा स्थितीत आता टीम इंडियाला विजयाने मालिका आणि दौरा संपवायचा आहे. मँचेस्टरमधील तिसर्या एकदिवसीय सामन्यासाठी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे, तथापि, पावसाची शक्यता नाही.
-
Snapshots from #TeamIndia's nets session ahead of the third and final ODI against England at Manchester.#ENGvIND pic.twitter.com/twA8AYKUgj
— BCCI (@BCCI) July 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Snapshots from #TeamIndia's nets session ahead of the third and final ODI against England at Manchester.#ENGvIND pic.twitter.com/twA8AYKUgj
— BCCI (@BCCI) July 16, 2022Snapshots from #TeamIndia's nets session ahead of the third and final ODI against England at Manchester.#ENGvIND pic.twitter.com/twA8AYKUgj
— BCCI (@BCCI) July 16, 2022
ओल्ड ट्रॅफर्डवरील भारताची कामगिरी -
भारताने ओल्ड ट्रॅफर्डवर आतापर्यंत 11 सामने खेळले ( India performance at Old Trafford ) आहेत, ज्यात 5 जिंकले आहेत आणि सहा गमावले आहेत. ओल्ड ट्रॅफर्ड येथे वर्ल्ड चॅम्पियन्सविरुद्ध केवळ एकदाच विजय मिळविल्यानंतर भारत इंग्लंडविरुद्धच्या त्यांच्या एकहाती विक्रमात सुधारणा करू पाहत आहे. रविवारी होणाऱ्या शेवटच्या सामन्यात भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -
इंग्लंड : जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, डेव्हिड विली, क्रेग ओव्हरटन, ब्रायडन कारर्स आणि रीस टॉप्ली.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.