एजबॅस्टन : भारत आणि इंग्लंड ( IND vs ENG ) संघात कसोटी मालिकेनंतर तीन सामन्याच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आहे. तसेच आज या मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन येथील स्टेडिमवर संध्याकाळी सातला सुरु होणार आहे. तत्पुर्वी नाणेफेक पार पडली आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( England opt to bowl ) आहे. त्याचबरोबर रोहित शर्माच्या नेतृत्वाखील खेळणाऱ्या भारतीय संघाला प्रथम फलंजदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे.
या टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी भारतीय संघाने जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने ( All-rounder Hardik Pandya ) आपल्या शानदार कामगिरीने प्रभावित केले होते. आज ही त्याच्याकडून याच खेळीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असणार आहे.
भारतीय संघात चार, तर इंग्लंड संघात दोन बदल -
आजच्या सामन्यात भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिनेश कार्तिक, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या प्रमुख खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर इंग्लंडच्या संघात देखील दोन बदल करण्यात आले आहेत. विली आणि ग्लिसन यांना मिल्स आणि टॉप्लीच्या जागी संधी देण्यात आली आहे.
-
From 🌹 to 🌹@liaml4893 presented @RicGleeson his England Men's IT20 cap! 👏
— England Cricket (@englandcricket) July 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🏴 #ENGvIND 🇮🇳 | @lancscricket pic.twitter.com/g3DCt281ul
">From 🌹 to 🌹@liaml4893 presented @RicGleeson his England Men's IT20 cap! 👏
— England Cricket (@englandcricket) July 9, 2022
🏴 #ENGvIND 🇮🇳 | @lancscricket pic.twitter.com/g3DCt281ulFrom 🌹 to 🌹@liaml4893 presented @RicGleeson his England Men's IT20 cap! 👏
— England Cricket (@englandcricket) July 9, 2022
🏴 #ENGvIND 🇮🇳 | @lancscricket pic.twitter.com/g3DCt281ul
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.
-
England have won the toss and elect to bowl first in the 2nd T20I
— BCCI (@BCCI) July 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at our Playing XI for the game 👇👇
Live - https://t.co/o5RnRVGuWv #ENGvIND pic.twitter.com/SkEUSwtzVW
">England have won the toss and elect to bowl first in the 2nd T20I
— BCCI (@BCCI) July 9, 2022
A look at our Playing XI for the game 👇👇
Live - https://t.co/o5RnRVGuWv #ENGvIND pic.twitter.com/SkEUSwtzVWEngland have won the toss and elect to bowl first in the 2nd T20I
— BCCI (@BCCI) July 9, 2022
A look at our Playing XI for the game 👇👇
Live - https://t.co/o5RnRVGuWv #ENGvIND pic.twitter.com/SkEUSwtzVW
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार, यष्टीरक्षक), डेविड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, मोईन अली, सॅम करन, डेव्हिड विली, ख्रिस जॉर्डन, रिचर्ड ग्लीसन आणि मॅथ्यू पार्किन्सन
हेही वाचा - Cricketer Ravindra Jadeja : अष्टपैलू रवींद्र जडेजा सीएसकेला ठोकणार राम राम? पाहा काय आहे कारण..