ETV Bharat / bharat

शिवसेना बंडखोरांच्या दिमतीला आसाममध्ये भाजप नेत्यांची टीमच.. आसामच्या मुख्यमंत्र्यांचे 'हे' पाच शिलेदार मैदानात.. - आसामचे मुख्यमंत्री हिमनता बिस्वा सरमा

मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या शिवसेना बंडखोरांच्या ( Shivsena Rebel MLAs ) दिमतीला भाजपने त्यांची संपूर्ण टीमच मैदानात उतरली ( BJP Supports Shivsena Rebel MLAs ) आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ( assam cm himanta biswa sarma ) यांचे खासमखास असलेले पाच शिलेदार या शिवसेनेच्या बंडखोरांची ठेप ठेवत आहेत. तर पाहुयात कोण आहेत हे भाजपचे नेते.

BJP leaders who are managing the Shiv Sena rebel MLAs in Assam
आसामच्या मुख्यमंत्र्यांचे 'हे' पाच शिलेदार मैदानात..
author img

By

Published : Jun 24, 2022, 9:56 AM IST

हैदराबाद : काँग्रेस- राष्ट्रवादीशी असलेली महाविकास आघाडी सोडून शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडत भाजपशी हातमिळवणी करण्याची मागणी करत शिवसेनेच्या आमदारांनी ( Shivsena Rebel MLAs ) एकनाथ शिंदेंच्या ( Eknath Shinde ) नेतृत्वाखाली बंड पुकारले आहे. या बंडखोर आमदारांची व्यवस्था गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये ( Radison Blu Hotel Guwahati ) करण्यात आली आहे. या सर्व राजकीय नाट्ट्यात आमचा हात नसल्याचे भाजपचे नेते म्हणत असले तरी बंडखोरांना असलेला भाजपचा सपोर्ट काही लपून राहिलेला ( BJP Supports Shivsena Rebel MLAs ) नाही. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ( assam cm himanta biswa sarma ) यांचे खासमखास असलेले पाच नेते याच हॉटेलमध्ये तळ ठोकून बंडखोरांची खातिरदारी करत आहेत. जाणून घेऊयात या पाच नेत्यांविषयी..

आसामचे मुख्यमंत्री दिल्लीतून फिरवताहेत सूत्र : महाराष्ट्रातील ४५ हुन अधिक बंडखोर आमदार आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये आलेले असताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे या बंडखोरांना भेटण्यासाठी येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र हिमंता हे दिल्लीत बसून गुवाहाटीतील सूत्र फिरवत आहेत. हिमंता यांनी आसाममधील त्यांच्या खास लोकांवर ही जबाबदारी सोपवली असून, बंडखोर आमदार गुवाहाटीत आल्यापासून त्यांची खातिरदारी केली जात आहे.

आणखी आमदार सहभागी होण्याची शक्यता : गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमधल्या 42 बंडखोर आमदारांचा (42 rebel MLAs from Maharashtra) फोटो आला समोर आला आहे. यात महाराष्ट्रातील 42 बंडखोर आमदार दिसत आहेत. यात 35 आमदार शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आमदार दिसत आहेत. ते एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषना देत असल्याचे दिसून आले. यामध्ये आज आणखी काही आमदार सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मंत्री जयंता मल्ला बरुआ : आसाममध्ये आलेल्या शिवसेना बंडखोर आमदारांची व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी प्रामुख्याने मुख्यमंत्री हिमंता यांचे खास असलेले मंत्री जयंता मल्ला बरुआ यांच्यावर सोपविण्यात आली आहे. हे बंडखोर आमदार गुवाहाटीला आल्यापासून बरुआ हे हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. आमदारांना काय हवे काय नको, याची सर्व जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

मंत्री अशोक सिंघल, पिजूस हजारिका : मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जाणारे मंत्री अशोक सिंघल आणि पिजूस हजारिका हे बंडखोर आमदारांना विमानतळावरून घेऊन हॉटेलमध्ये सुरक्षित पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आमदारांच्या येण्या-जाण्यावर ते करडी नजर ठेऊन आहेत.

खासदार पल्लभ लोचन दास आणि आमदार सुशांत बोरगोहेन : हे दोघेही आसामच्या मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांच्यावर बंडखोर आमदारांचा संपर्क केंद्रीय आणि राज्य भाजपच्या नेत्यांशी ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबविण्यासाठी अत्यंत गुप्तता बाळगण्यात येत असून, त्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी या बंडखोरांचा समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : Maharashtra Political Crisis : 12 बंडखोर आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.