ETV Bharat / bharat

Important News Today : एका क्लिकवर जाणून घ्या, आजच्या ठळक घडामोडी - Gram Panchayat Election 2022

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेवू या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. (News stories of national and local importance )

Important News Today
आजच्या ठळक घडामोडी
author img

By

Published : Oct 17, 2022, 7:06 AM IST

महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा :

आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान (Congress President Election): आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले जाणार आहे. 137 वर्षात सहाव्यांदा अशी स्पर्धा होणार आहे. आज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

वाराणसी ज्ञानवापी खटल्याची आज सुनावणी (Gyanvapi Case Hearing Today) - आज ज्ञानवापी खटल्याची पुढील सुनावणी होणार आहे.वाराणसीच्या ज्ञानवापी परिसरात आढळलेल्या 'कथित शिवलिंगा'चे वय शोधण्यासाठी आता कार्बन डेटिंग होणार नाही. चार हिंदू महिला याचिकाकर्त्यांनी ज्ञानवापी मशिदीतील वजूखान्यात आढळलेल्या शिवलिंगासारख्या रचनेच्या शास्त्रीय तपासणीची मागणी केली होती. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून (ASI) ही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली होती. वाराणसी जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी ही याचिका फेटाळली आहे.

दृश्यम 2 चा टिझर आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार ( teaser of Drishyam 2 released today): आज या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दृश्यम 2'चं नवं पोस्टर रिलीज होण्याआधी या सिनेमाचा कमाल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीझर आऊट करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. अजय देवगन स्टार 'दृश्यम 2' हा सिनेमा पुढील महिन्यात 18 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

संजय राऊत पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात आज सुनावणी (Sanjay Raut Case Hearing Today): पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला होता. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी आज होणार आहे.

1165 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी (Gram Panchayat Election 2022) : काल राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या अशा हजारो ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. आज मतदानाची मतमोजणी पार पडणार आहे.

आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता (Rain Update Today) : राज्यात परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. यंदा 3-4 ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस सुरु झाला आहे. परतीच्या पावसाचा परिणामही राज्यभरात वेगवेगळ्या भागात दिसून येत आहे. हवामानतज्ज्ञांच्या माहितीनुसार, आज कोकण, मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.