- प्रकाश आंबेडकर घेणार कोश्यारींची भेट..
अँटिलिया प्रकरण, सचिन वाझे आणि यासंबंधी इतर बाबींबाबत चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतील.
- महाविकास आघाडीची बैठक..
परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब नंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सर्व विरोधी पक्षांकडून केली जात आहे. या सर्व प्रकरणामध्ये महाविकास आघाडी सरकार धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी महाविकास आघाडीची आज बैठक बोलावण्यात आली आहे.
- राजेश टोपे आज पुणे दौऱ्यावर..
आरोग्यमंत्री राजेश टोपे आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत. राज्यातील कोरोना पुन्हा वाढत असल्यामुळे ते पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतील.
- अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आज पुण्यात..
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आज पुण्यात असणार आहेत. अल्पसंख्याक विभागासंबंधी अधिकाऱ्यांच्या बैठकीला ते उपस्थित राहतील.
- पुण्यातील जंबो कोविड सेंटर आजपासून सुरू..
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुण्यातील जंबो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आजपासून याठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होतील. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर हे सेंटर बंद करण्यात आले होते.
- गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन..
परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब नंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सर्व विरोधी पक्षांकडून केली जात आहे. आज मुंबईमध्ये भाजपा या मागणीसाठी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
- मुंबईमध्ये आजपासून टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढ..
आजपासून मुंबईमधील रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी भाडेवाढ लागू केली आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असताना पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने ही भाडेवाढ लागू करण्यात आल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.