ETV Bharat / bharat

देवी पार्वतीची मुर्ती तामिळनाडूतून गेलेली चोरीला; 50 वर्षानंतर 'या' देशात सापडली

तामिळनाडूतील कुंभकोणम येथील नादनापुरेश्वर शिवन मंदिरातून देवी पार्वतीची मूर्ती 50 वर्षापूर्वी गायब झाली होती. ती मुर्ती आता न्यूयॉर्कमध्ये सापडली ( Parvati stolen from temple in Kumbakonam traced to US ) आहे.

Idol of Goddess Parvati
Idol of Goddess Parvati
author img

By

Published : Aug 8, 2022, 8:09 PM IST

तामिळनाडू - तामिळनाडूतील कुंभकोणम येथील नादनापुरेश्वर शिवन मंदिरातून देवी पार्वतीची मूर्ती 50 वर्षापूर्वी गायब झाली होती. ती मुर्ती आता न्यूयॉर्कमध्ये सापडली आहे. तामिळनाडू सीआयडीने सांगितले की, न्यूयॉर्कमधील बोनहॅम्स ऑक्शन हाऊसमध्ये ही मूर्ती सापडली ( Parvati stolen from temple in Kumbakonam traced to US ) आहे.

1000 हजार वर्ष जुनी असलेली ही मुर्ती अचानकपणे गायब झाली होती. 1971 साली याप्रकरणी स्थानिक पोलिसांती तक्रार देण्यात आलेली. त्यानंतर फ्रेब्रुवारी 2019 साली के वासू या व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार आयडॉल विंगचे निरीक्षक एम चित्रा यांनी तपास हाती घेतली. त्यांनी परदेशातील विविध संग्रहालये आणि लिलावगृहांमध्ये चोल काळातील पार्वती मूर्ती शोधण्यास सुरुवात केली.

अखेर शोध घेतल्यानंतर ही मूर्ती बोनहॅम्स ऑक्शन हाऊसमध्ये सापडली. चोल काळातील सुमारे 12 शतकातील तांबे-मिश्रधातूच्या मूर्तीची उंची सुमारे 52 सेमी आहे. या मूर्तीचे मूल्य 212,575 डॉलर ( सुमारे 1,68,26,143 रुपये आहे), असे आयडॉल विंगकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. पार्वती किंवा उमा ही देवी म्हणून सामान्यतः दक्षिण भारतात ओळखली जाते. दरम्यान, आयडॉल विंग सीआयडी यांच्या मते, त्यांच्या गटाने मूर्ती परत आणण्यासाठी कागदपत्रे तयार केली आहेत.

हेही वाचा - N V Ramana : देशाच्या सरन्यायाधीशांनी सर्वाधिक न्यायाधिशांची नियुक्ती करत रचला इतिहास

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.