ETV Bharat / bharat

यूपीएससी टॉपर टीना डाबींचा घटस्फोटासाठी अर्ज - tina dabi-atha aamir

टीना दिल्लीच्या रहिवासी आहेत, तर अतहर जम्मू-काश्मीरचे. यूपीएससीच्या प्रशिक्षणादरम्यान, टीना आणि अतहर दोघेही एकमेकांना पसंद करू लागले होते. ते दोघे एक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिले. यानंतर दोघांनी 2018मध्ये लग्नही केले. मात्र, आता हे आएएस जोडपे एकमेकांच्या सहमतीने वेगळे होत आहेत.

tina dabi-atha aamir
टीना दाबी-अतहर आमिर
author img

By

Published : Nov 20, 2020, 9:52 PM IST

जयपूर (राजस्थान) - 2016 वर्षातील यूपीएससी टॉपर राहिलेली टीना डाबी यांनी त्याच परीक्षेत सेकंड टॉपर राहिलेल्या अतहर आमिर उल शफी खान यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र, दोघांनी आज (शुक्रवारी) जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखले केला. आम्ही येथून पुढे सोबत राहू शकत नाही, असे त्यांनी अर्जात म्हटले असून दोघेही सहमतीने घटस्फोट घेत आहेत.

टीना दिल्लीच्या रहिवासी आहेत, तर अतहर जम्मू-काश्मीरचे. यूपीएससीच्या प्रशिक्षणादरम्यान, टीना आणि अतहर दोघेही एकमेकांना पसंद करू लागले होते. ते दोघे एक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिले. यानंतर दोघांनी 2018मध्ये लग्नही केले. मात्र, आता हे आएएस जोडपे एकमेकांच्या सहमतीने वेगळे होत आहेत.

टीना आणि त्यांचे पती अतहर आमिर यांच्याकडून शहरातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत न्यायालय त्यांच्या अर्जावर सुनावणी करणार आहे. दरम्यान, या अर्जात असे म्हटले आहे, की 'ते दोघे खूप वेळेपासून वेगळे राहत आहेत. यापुढे ते आपले वैवाहिक संबंध कायम ठेवू इच्छित नाहीत'.

हेही वाचा - श्रद्धा कपूरचा पोस्ट वर्कआउट सेल्फी पाहिलात का?

सोशल मीडियावर केले होते 'अनफॉलो' -

टीना यांचे पती अतहर यांनी काही महिन्याआधी टीना यांना सोशल मीडिया प्लॅटफार्मवरूनही अनफॉलो केले होते. यानंतर टीना यांनीही पती अतहर यांना ट्विटरवरून अनफॉलो केले आहे.

खान सरनेम भी हटाया -

लग्नानंतर आपल्या नावापुढे खान आडनाव लिहिणाऱ्या टीना यांनी काही दिवसांआधी खान हे आडनावही काढून टाकले. तसेच आपल्या इन्स्टाग्रामच्या बायोतून 'कश्मीरी बहू' हा शब्द काढून टाकला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.