मेष - आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला व ताप यामुळे प्रकृती बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. परोपकारात धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल. सबब सांभाळून राहा. मानसिक बेचैनी राहील. मांगलिक व सामाजिक कार्यावर पैसा खर्च करावा लागेल.
वृषभ - आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात सुख व शांती राहील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात व व्यापार - व्यवसायात वाढ होईल. रम्य स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत आखाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. त्यांच्याकडून आदर मिळेल. व्यापारात ओळख व संपर्क यांमुळे लाभ होईल. संतती व पत्नी यांच्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. दांपत्यसुख उत्तम मिळेल.
मिथुन - आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल व फायदा सुद्धा होईल. संतती कडून लाभ होऊ शकतो. उत्तम भोजन मिळेल. संतती कडून एखादी चांगली बातमी मिळेल. नोकरी - व्यवसायात प्राप्ती वाढेल.
कर्क - आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील. बढती मिळू शकते. वरिष्ठांशी महत्वपूर्ण चर्चा होतील. तसेच कुटुंबियांसह सुद्धा मनमोकळी चर्चा होईल. गृहसजावटी संदर्भात नवीन काही योजना आखाल. कामासाठी प्रवास करावा लागेल. मातुल घराण्याशी संबंध दृढ होतील. आरोग्य उत्तम राहील. तसेच सरकार कडून ही फायदा संभवतो.
सिंह - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. प्रवास संभवतात. आज आपला संताप वाढल्याने आपले मन अशांत होईल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आज व्यवसायात अडथळा येईल. परदेशातील आप्तांकडून खुषालीची बातमी मिळेल.
कन्या - आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळावे लागेल. आज आपला स्वभाव चिडचिडा झाल्याने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खूप खर्च होईल. पाण्या पासून जपून राहावे लागेल. सरकार विरोधी कृत्ये, भांडणे ह्यापासून शक्य तितके दूर राहावे.
तूळ - आजचा दिवस आनंददायी आहे. भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. नवीन वस्त्र खरेदी कराल. तसेच वस्त्रालंकार वापरण्याचे प्रसंग येतील. शरीर व मन तंदुरुस्त राहील. लोकांमध्ये मान - सन्मान मिळेल. रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
वृश्चिक - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. नवीन कार्य शक्यतो आज सुरू करू नये. आर्थिक नियोजनासाठी अनुकूलता असल्यामुळे आपल्या कष्टाचे फळ मिळेल. जुगारसदृश बाबींपासून शक्यतो दूर राहावे. प्रवास सुद्धा शक्यतो टाळावेत.
धनू - आज मनात औदासिन्य दिसून येईल. शारीरिक उत्साह व मानसिक तरतरी ह्यांचा अभाव असेल. कुटुंबीयांशी तणावाच्या प्रसंगामुळे घरातील वातावरण कलुषित होईल. एखादी मानहानी संभवते. वित्तहानी सुद्धा संभवते. जमीन वा वाहना संबंधीची कागदपत्रे सावधपणे तयार करा.
मकर - आजचा दिवस नवीन कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. नोकरी, व्यापार व दैनंदिन कामात अनुकूल स्थिती असल्याने मन प्रसन्न राहील. भावंडां कडून सहकार्य मिळून लाभ सुद्धा होतील. आर्थिक लाभ संभवतात. विद्यार्थ्यांना विनासायास अभ्यास करता येईल.
कुंभ - आज वाद - विवाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. घरातील वातावरण कलुषित होईल. कामात अपयश आल्याने मन दुःखी होऊन नैराश्य येईल. आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. निर्णय क्षमतेचा अभाव दिसून येईल.
मीन - आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. संताप व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज कोणाशीही मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आज आर्थिक देवाण - घेवाण सावधपणे करावी लागेल. आप्त स्वकीयांशी वाद होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारणच राहील. मनात नकारात्मक विचार येतील.