मेष - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण एखाद्या अडचणीत सापडू शकता. नोकरीत इतरांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. नशिबाची साथ मिळणार नाही. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. वैवाहिक जीवनातील वातावरण आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. काही नियोजित आर्थिक लाभ होतील.
वृषभ - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपण हळवे व्हाल व त्यामुळे आपणास बेचैनी जाणवेल. शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवा. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. व्यवसायात विघ्ने येतील. नोकरीत वरिष्ठांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी सुद्धा वाद संभवतात. कामात विलंबाने यशप्राप्ती होईल, तेव्हा धैर्याने वागावे लागेल.
मिथुन - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र व संबंधितांना सहभागी करून घ्याल. दुपार नंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील. हळवेपणाचे प्रमाण वाढेल. संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
कर्क - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. नोकरीतील उत्तम कामगिरीमुळे बढती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसह सहल व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेण्याची संधी प्राप्त होईल. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी यशस्वीपणे विचार विनिमय करू शकाल.
सिंह - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. साहित्य व कला ह्यातील गोडी वाढेल. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रकृतीत सुधारणा होईल. व्यापार - व्यवसायात लाभ होतील.
कन्या - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मातेची प्रकृती बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानी संभवते. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. शक्यतो प्रवास टाळावेत. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या विषयी चिंता निर्माण होईल. रागावर संयम ठेवा. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेपासून दूर राहणे हितावह होईल.
तूळ - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करण्यास अनुकूल आहे. गूढ विद्यांचे आकर्षण निर्माण होईल. दुपार नंतर मात्र आनंद व उत्साहाचा अभाव जाणवेल. कुटुंबात कलह संभवतात. मानहानी संभवते.
वृश्चिक - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे कुटुंबीयांची मने दुखावण्याची शक्यता आहे. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मनाची अवस्था द्विधा होईल. कामाचा व्याप वाढेल. दुपार नंतर मात्र मनातील मरगळ दूर होईल. मित्र आणि संबंधीतांशी सुसंवाद साधू शकाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. नशिबाची साथ मिळेल.
धनू - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. प्रवास संभवतो. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. दुपार नंतर कुटुंबात काही कारणास्तव वाद होतील. केलेल्या कामाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येईल. अंतिम व ठोस निर्णय घेण्यासारखी मनःस्थिती असणार नाही.
मकर - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या बोलण्या वागण्यात संयमित राहावे लागेल. अपघाताची शक्यता असल्याने वाहन जपून चालवावे लागेल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मन प्रसन्न होईल. घरातील वातावरण चांगले राहील.
कुंभ - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. नवीन परिचय होतील. परंतु दुपार नंतर प्रकृती बिघडेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. पैसा जास्त खर्च होईल. कोर्ट- कचेरीच्या कामांत सावध राहावे लागेल. स्वभाव चिडचिडा होईल.
मीन - आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज द्विधा मनःस्थितीमुळे आपले विचार ठाम राहू शकणार नाहीत. नोकरीत वरिष्ठांकडून लाभ होतील. पदोन्नती संभवते. व्यापार विषयक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. कुटुंबात सुख समाधान नांदेल. वडीलधार्यांकडून लाभ होतील. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर सुद्धा लाभ संभवतात. मित्रांसह सहलीस जाण्याचे आयोजन करू शकाल.