ETV Bharat / bharat

Holi 2023 : का साजरा केला जातो 'होळी' हा सण? कोणकोणत्या प्रदेशात रंगपंचमी कशी साजरी केली जाते? जाणून घ्या होळी सणाची सविस्तर माहिती - होळी सणाची सविस्तर माहिती

होळी हा रंगांचा सण (Holi 2023) आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. 2023 मध्ये 7 मार्च मंगळवार रोजी होळीचे दहन (Holi Dahan date) आहे. तसेच 8 मार्च बुधवार रोजी धुलिवंदन आहे. होळीच्या ८ दिवस आधी होलाष्टक येतो. यावेळी २८ फेब्रुवारीपासून होलाष्टक साजरे केले जात आहे. होळी दहनाची तिथी आणि शुभ मुहूर्त, परंपरा, महत्व काय आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Holi 2023
होळी आणि रंगपंचमी
author img

By

Published : Feb 3, 2023, 6:37 PM IST

हिंदू धर्मात होळीला खूप महत्त्व आहे. होळी हा रंगांचा सण आहे. तो देशभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, होळी दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. तसेच होळीच्या ८ दिवस आधी होलाष्टक येतो. या वेळी मंगळवार 28 फेब्रुवारी 2023 पासून होलाष्टक सुरू होत आहे. तर 7 मार्च 2023, मंगळवार रोजी होळीचे दहन केले जाणार आणि 8 मार्च बुधवार रोजी धुलिवंदन आहे. सनातन धर्मात फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

होळी दहनाचा शुभ मुहूर्त : फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तारीख: 6 मार्च 2023 दुपारी 4.17 वाजता पासुन सुरु होते आहे. तर फाल्गुन महिन्याचा शेवट पौर्णिमा तारीख: 7 मार्च 06:09 वाजता होतो आहे. होळीचे दहन: 7 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6:24 ते 8:51 पर्यंत राहील. आणि ८ मार्च बुधवार रोजी धुलिवंदन आहे.

होळी दहन कसे करावे : होळी दहनात झाडाची फांदी जमिनीत गाडली जाते आणि त्याच्या चारही बाजू लाकूड, पेंढ्या किंवा शेणाच्या गौरीने झाकल्या जातात. या सर्व वस्तू शुभ मुहूर्तावर जाळल्या जातात. छिद्रे असलेली शेणाची गौरी, गव्हाच्या आणि शेणखता त्यात टाकतात. याने माणसाला वर्षभर आरोग्य लाभते आणि या अग्नीत सर्व दुष्कृत्ये जळून जातात, अशी श्रद्धा आहे. होलिका दहनाच्या दिवशी लाकडाची राख घरात आणून तिच्यासोबत टिळक करण्याचीही परंपरा आहे. होलिका दहनाला अनेक ठिकाणी छोटी होळी असेही म्हणतात.

होळी दहन पूजा विधी : सर्वप्रथम होळी जळत असते, त्या गोलाकार वर्तुळाच्या बाहेर तांब्याच्या लोट्याने थोडे पाणी शिंपडावे. त्यानंतर होळीमध्ये अक्षदा आणि हळदी-कुंकु, गुलाल टाकुन पूजा करावी. होळी या सणाला गाठीचे आणि पुरण पोळीचे फार महत्व असते. तेव्हा होळी मध्ये संपूर्ण वरण, भात, भाजी, पोळी यासह पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवुन, तो जळत्या अग्नीत टाकावा. त्यानंतर नारळ देखील अग्नीला अर्पण करावे. आणि हात जोडून जळत्या अग्निला नमस्कार करावा. असे म्हणतात की, होळी दहनानंतर संपूर्ण कुटुंबासह चंद्र दर्शन केल्यास, अकाली मृत्यूची भीती दूर होते. तसेच होळीच्या दहनाच्या आधी होळीला सात परिक्रमा घालाव्या. आणि त्यामध्ये मिठाई, वेलची, लवंग, धान्य, नारळ इत्यादी टाकल्यास कुटुंबात सुख-समृद्धी येते.

होळीची पौराणिक कथा : पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी हिरण्यकश्यप नावाचा असुर राजा होता. गर्वाने तो स्वतःला देव म्हणू लागला होता. हिरण्यकश्यपने आपल्या राज्यात फक्त देवाचे नाव घेण्यास बंदी घातली होती आणि स्वतःला देव समजू लागला होता. पण हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवंताचा भक्त होता. दुसरीकडे, हिरण्यकश्यपची बहीण होलिका हिला अग्नीत भस्म न होण्याचे वरदान लाभले. एकदा हिरण्यकश्यपने होलिकाला प्रल्हादला तिच्या मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याची आज्ञा दिली. पण आगीत बसलेली होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद वाचला. तेव्हापासून देवाचे भक्त प्रल्हाद यांच्या स्मरणार्थ होलिका दहन सुरू झाले. आणि भाविक होळीच्या दिवशी या पवित्र अग्निची पूजा करतात.

धूलिवंदन किंवा रंगपंचमी : 2023 मध्ये 8 मार्च बुधवार रोजी धुलिवंदन आहे. या दिवशी लोक वेगवेगळ्या रंगांची होळी खेऴून आनंद साजरा करतात. प्रत्येक राज्यात धुलिवंदन साजरी करण्याची प्रथा वेगवेगळी आहे. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात. व खाण्यासाठी विविध पदार्थ करतात. महाराष्ट्रात होळी दहनाच्या दिवशी केल्या जाणाऱ्या पुरण पोळीला फार महत्व आहे. तसेच रंगपंचमीच्या दिवशी तयार केल्या जाणारे विशेष तर्री पोहे, पकोडे, चने हे पदार्थ खाण्यास लोकांची पसंती असते.

वेगवेगळ्या प्रदेशात साजरा होणारा होळीचा सण : देशाच्या प्रत्येक भागात होळीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशात होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते, जी मुख्य होळीपेक्षा जास्त उत्साहाने खेळली जाते. ब्रज भागात होळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. तर बरसाना येथे लाठीमार होळी खेळली जाते. मथुरा आणि वृंदावनमध्येही होळी १५ दिवस साजरी केली जाते. हरियाणात होळीच्या दिवशी वहिनी कडून दिराला रंग लावण्याची करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात रंगपंचमीच्या दिवशी वाळलेल्या गुलालाची होळी खेळण्याची परंपरा आहे. दक्षिण गुजरातमधील आदिवासींसाठी होळी हा सर्वात मोठा सण आहे. छत्तीसगडमध्ये लोकगीते खूप लोकप्रिय आहेत आणि होळीला मालवंचलमध्ये भगोरिया म्हणून ओळखले जाते. तसेच बिहार, झारखंड या भागात देखील होळी हा सण नवविवाहित जोडप्यांसाठी विशेष मानला जातो.

हेही वाचा : Mahashivratri 2023 : यंदाची महाशिवरात्री आहे अत्यंत खास, सर्वार्थ सिद्धी योगासह येतोय शनि प्रदोषचा दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.