ETV Bharat / bharat

Hindu Mahasabha: चलनी नोटांवर नेताजींचा फोटो लावा - हिंदू महासभा

author img

By

Published : Oct 22, 2022, 10:58 AM IST

अखिल भारतीय हिंदू महासभेने (Akhil Bharatiy Hindu Mahasabha) शुक्रवारी चलनी नोटांवर महात्मा गांधींचे चित्र बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चित्र लावावे, अशी मागणी केली आहे. (Netaji photo on currency).

Netaji photo on currency notes
चलनी नोटांवर नेताजींचा फोटो

कोलकाता: अखिल भारतीय हिंदू महासभेने (Akhil Bharatiy Hindu Mahasabha) शुक्रवारी चलनी नोटांवर महात्मा गांधींचे चित्र बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चित्र लावावे, अशी मागणी केली आहे. (Netaji photo on currency). याआधी सुद्धा दुर्गा पूजेत हिंदू महासभेने महात्मा गांधीं सदृश महिषासूर मूर्ती उभारून वाद ओढावून घेतला होता. आता त्याच्या काही आठवड्यांनंतर संघटनेकडून ही मागणी करण्यात आली आहे.

काय म्हणाली हिंदू महासभा? : हिंदू महासभेचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रचूर गोस्वामी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, आम्हाला वाटते की देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेताजींचे योगदान महात्मा गांधींपेक्षा कमी नव्हते. त्यामुळे भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी नेताजींना सन्मानित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चलनी नोटांवर त्यांचा फोटो लावणे हा आहे. चलनी नोटांवर गांधीजींच्या जागी नेताजींचा फोटो लावला पाहिजे.

तृणमूल आणि कॉंग्रेस कडून टीका: गोस्वामींच्या या मागणीवर टीएमसी आणि काँग्रेसने टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की भाजपच्या शाखांनी पश्चिम बंगालमध्ये फुटीरतावादी राजकारण करणे थांबवावे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यात गांधीजींची भूमिका निर्विवाद आहे. महात्मा गांधींच्या हत्येमागे कोणाचा हात होता हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि आता त्यांच्या आदर्शांची आणि तत्त्वांची रोज हत्या केली जात आहे. याचे उत्तर भाजप आणि आरएसएसने द्यायला हवे, असेही ते म्हणाले.

महिषासूर वादावर सफाई: गांधीजींना महिषासुर म्हणून चित्रित करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. हे अनावधानाने होते. या मुद्द्यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी ते करणे टाळावे, असे अखिल भारतीय हिंदू महासभेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पुढील वर्षीच्या पंचायत निवडणुका लढवेल: राज्यातील आपल्या संघटनेच्या योजनेवर बोलताना गोस्वामी म्हणाले की, संघटना पुढील वर्षीच्या पंचायत निवडणुका लढवेल. राज्यातील हिंदू बंगालींच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी तृणमूल किंवा भाजप दोघेही सक्षम नाहीत. आम्ही त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी लढा देऊ. आम्ही काही भाजप आमदारांच्या बंगालच्या विभाजनाच्या मागणीलाही पाठिंबा देत नाही. आम्हाला राज्य मजबूत करण्याच्या दिशेने काम करायचे आहे, असे ते म्हणाले. हिंदू महासभा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वाढत असल्याचा दावा करत गोस्वामी म्हणाले की, आम्ही पंचायत निवडणुका लढवू आणि आश्चर्यकारक निकाल देऊ.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.