श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड ( grenade attack by terrorist in Srinagar JK ) हल्ला केला. या हल्ल्यात दोन नागरिकाचा ( civilian killed in grenade attack ) मृत्यू झाला आहे. तर पोलीस कर्मचार्यांसह 23 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये एक पोलीस कर्मचारी आणि 22 नागरिकांचा समावेश आहे. श्रीनगरच्या अमीरा कादल मार्केटमध्ये हा ग्रेनेड हल्ला झाला. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली.
-
#UPDATE | Death toll rises to two in yesterday's grenade attack at Amira Kadal market in Srinagar, Jammu & Kashmir
— ANI (@ANI) March 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE | Death toll rises to two in yesterday's grenade attack at Amira Kadal market in Srinagar, Jammu & Kashmir
— ANI (@ANI) March 7, 2022#UPDATE | Death toll rises to two in yesterday's grenade attack at Amira Kadal market in Srinagar, Jammu & Kashmir
— ANI (@ANI) March 7, 2022
या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून गुन्हेगारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात अमीरा कडाल बाजारजवळ असाच हल्ला झाला होता. ज्यामध्ये 10 नागरिक जखमी झाले होते. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटी की ( JK Pradesh Congress Committe condemned grenade attack ) यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि हल्लेखोरांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
सज्जाद लोन यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स कॉन्फरन्स आणि अपनी पार्टीचे अध्यक्ष अल्ताफ बुखारी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. भारतीय जनता पक्षाच्या जम्मू-काश्मीर युनिटचे अध्यक्ष अल्ताफ ठाकूर यांनी हा हल्ला क्रूर आणि भ्याड असल्याचे म्हटले आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनीदेखील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.
हेही वाचा - Uttar Pradesh Phase 7 Updates : युपीत विधानसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा, 54 जागांसाठी मतदान सुरू