नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमतीत तीव्र घसरण ( A sharp drop in edible oil ) होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने खाद्यतेल कंपन्यांना एका आठवड्याच्या आत आयात केलेल्या खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत प्रति लिटर १० रुपयांनी कपात ( Reduction by Rs. 10 per liter ) करण्याचे निर्देश ( government instruction on MRP ) दिले आहेत. यासोबतच एका ब्रँडच्या तेलाची किंमत संपूर्ण देशात सारखीच असावी, असे कंपन्यांना सांगण्यात आले आहे. भारत आपल्या गरजेच्या ६० टक्क्यांहून अधिक खाद्यतेलाची आयात करतो. अशा स्थितीत, जागतिक बाजाराच्या अनुषंगाने, किरकोळ किमती गेल्या काही महिन्यांत दबावाखाली आल्या आहेत.
ग्राहकांपर्यंत फायदा पोहचवा : याचे कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. खाद्यतेल निर्मात्यांनी गेल्या महिन्यात प्रति लिटर १०-१५ रुपयांपर्यंत दरात कपात केली आणि त्याआधी जागतिक बाजारातील संकेतानुसार एमआरपी कमी केली. जागतिक किमतीत आणखी घसरण लक्षात घेऊन, अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सर्व खाद्यतेल संघटना आणि प्रमुख उत्पादकांची बैठक बोलावून प्रचलित परिस्थितीवर चर्चा केली आणि प्रति रक्कम कमी करून जागतिक किमती घसरल्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहचवा, असे निवदेन बैठकीत करण्यात आले.
खाद्यतेल उत्पादक, निर्मात्यांनी कमी किमतीचे दिले आश्वासन : बैठकीनंतर पांडे म्हणाले की, आम्ही सविस्तर सादरीकरण केले आणि त्यांना सांगितले की, गेल्या एका आठवड्यात जागतिक किमती 10 टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आम्ही त्यांना एमआरपी कमी करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, प्रमुख खाद्यतेल उत्पादकांनी पुढील आठवड्यापर्यंत सर्व आयातीत खाद्यतेल जसे की, पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावर एमआरपी 10 रुपयांनी कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.
अन्न सचिवांनी केले एकच किंमत ठेवण्याचे आवाहन : या खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या की इतर तेलांच्या किमतीही खाली येतील, असे ते म्हणाले. याशिवाय अन्न सचिवांनी उत्पादकांना देशभरातील एकाच ब्रँडच्या स्वयंपाकाच्या तेलासाठी एकच एमआरपी ठेवण्यास सांगितले आहे. सध्या वेगवेगळ्या प्रदेशात एमआरपीमध्ये प्रतिलिटर तीन ते पाच रुपयांची तफावत आहे. ते म्हणाले की, सध्या वेगवेगळ्या प्रदेशात विकल्या जाणाऱ्या एकाच ब्रँडच्या खाद्यतेलाच्या एमआरपीमध्ये तीन ते पाच रुपयांची तफावत आहे. जेव्हा वाहतूक आणि इतर खर्च आधीच एमआरपीमध्ये समाविष्ट केले जातात तेव्हा एमआरपीमध्ये फरक नसावा.
अनुचित व्यापार पद्धतीवर आक्षेप : यासाठी कंपन्यांनी सहमती दर्शवल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत समोर आलेला तिसरा मुद्दा म्हणजे खाद्यतेलाच्या ब्रँडच्या अनुचित व्यापार पद्धतींबाबत ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी. सचिव म्हणाले की, काही कंपन्या पॅकेजवर लिहित आहेत की, खाद्यतेल 15 डिग्री सेल्सिअस तापमानात पॅक केले जाते. या तापमानात तेलाचा विस्तार होतो आणि वजन कमी होते. आदर्शपणे ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानात पॅक केले पाहिजेत. 15 डिग्री सेल्सिअस तपमानावर पॅक केल्यावर, तेलाचा विस्तार होतो आणि वजन कमी होते.
ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची घ्यावी दक्षता : आता विस्तार होणारे आणि कमी वजनाचे तेल पॅक ज्यावेळी पॅक करतात. तेव्हा पॅकेजवर कमी वजन छापले जात नाही, ही अनुचित व्यापार प्रथा आहे. ते म्हणाले की, उदाहरणार्थ कंपन्या छापत आहेत की, 910 ग्रॅम अन्न 15 डिग्री सेल्सिअस तापमानात पॅकेज केले जाते, परंतु वास्तविक वजन 900 ग्रॅमपेक्षा कमी असते. ग्राहक व्यवहार मंत्रालयालाही याची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 6 जुलैपर्यंत, पामतेलाची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 144.16 रुपये प्रतिकिलो, सूर्यफूल तेल 185.77 रुपये प्रतिकिलो, सोयाबीन तेल 185.77 रुपये प्रतिकिलो, मोहरीचे तेल 177.37 रुपये प्रति कलो आणि शेंगदाणा प्रतिकिलो तेल 187.93 रुपये होते.
हेही वाचा : Gold Silver Rates : चांदीच्या भावात मोठी घसरण.. सोन्याचीही किंमत झाली कमी.. जाणून घ्या आजचे दर