ETV Bharat / bharat

Goa Election : गोव्यात येणारे पक्ष हे परदेशी जातीचे पक्षी आहेत - देवेंद्र फडणवीस - Parties coming to Goa

मांद्रे विधानसभा मतदारसंघात ( Mandre Assembly constituency ) भाजपचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर ( Former BJP CM Laxmikant Parsekar ) यांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी आमदार दयानंद सोपटे ( MLA Dayanand Sopte ) यांनी याचवेळी भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता, यानिमित्ताने एकाच मतदारसंघात दोन्ही नेत्यांनी शक्तिप्रदर्शन करत विधानसभा तिकिटावर दावा केला आहे.

Goa Election
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
author img

By

Published : Nov 23, 2021, 10:24 AM IST

Updated : Nov 23, 2021, 12:40 PM IST

पणजी - राज्याच्या राजकारणात दयानंद सोपटे विरुद्ध माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हा वाद तसा जुनाच, मात्र सोमवारी दोन्ही नेत्यांनी पक्ष श्रेष्टीसमोर आपापल्या समर्थकांसह कार्यक्रमात शक्तिप्रदर्शन केले. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आरलेकर यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक ( Union Minister Shripad Naik ), मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( CM Dr. Pramod Sawant ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र हा सोहळा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आयोजित केल्याचे बोलले जात होते. याचाच भाग म्हणून पार्सेकरांनी आपल्या समर्थकांसह जय्यत तयारी केली होती.

गोव्यात येणारे पक्ष हे परदेशी जातीचे पक्षी आहेत - देवेंद्र फडणवीस
  • सोपटेचं शक्तिप्रदर्शन आणि सरशीही -

आपल्याच मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि राजकीय विरोधक अशाप्रकारे सोहळा आयोजित करतात आणि त्याला केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर आमदार दयानंद सोपटेनिही ( MLA Dayanand Sopte ) राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केली. पार्सेकरांना प्रतिउत्तर देण्यासाठी त्यांनी चक्क अल्पावधीतच कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. आणि या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री सावंत यांच्यासह राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले होते. यावेळी सोपटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपणच येथील भावी आमदार असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. यावेळी फडणवीस यांनी सोपटेनच्या कामाचे कौतुक केले.

  • राज्यात सध्या सायबेरीयन जातीचे पक्षी येतात- फडणवीस

राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलीये, त्यामुळे हंगामात ज्या पद्धतीने सायबेरीयन पक्षी भारतात येतात आणि पुन्हा परत जातात तसेच काही राजकीय पक्ष दिल्ली आणि पश्चिम बंगालमधून गोव्यात निवडणुकीच्या हंगामात दाखल झाले आहेत, मात्र ते पराजितच होऊन परत जाणार असल्याचे राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले व त्यांनी आपल्या भाषणात नेतृत्वहीन असणाऱ्या काँग्रेस व राहुल गांधी यांचा समाचारही घेतला.

  • विरोधक मला संपविण्यासाठी एकत्र आले -

राज्यात स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेमुळे प्रगती होत आहे. मात्र ही प्रगती विरोधकांना पाहवत नाही म्हणून आपण मुख्यमंत्री म्हणून काम करत असतानाच विरोधक आपल्याला संपविण्यासाठी एकत्र येत असल्याचा मिश्किल टोला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी लगावला.

हेही वाचा - GOA ELECTION : लुझिनो फलेरो यांना तृणमुलकडून राज्यसभेची खासदारकी

हेही वाचा - GOA ASSEMBLY ELECTION 2022 मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांचे शक्तिप्रदर्शन; गरज पडल्यास कठीण संघर्षाचे दिले संकेत

Last Updated : Nov 23, 2021, 12:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.