ETV Bharat / bharat

Goa Assembly Session: गोव्यात अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी कोळशावरुन पेटलं राजकारण

author img

By

Published : Jul 16, 2022, 8:25 AM IST

रेल्वेचे दुपदरीकरण, महामार्ग ( Highway ) विस्तार व तामनार वीज प्रकल्प हा थ्रीलिनियेर प्रोजेक्ट रद्द करावा, या मागणीसाठी काँग्रेसने सभागृहात गोंधळ घालत पावसाळी अधिवेशनाचे कामकाज बंद केले.

गोवा विधानसभेचे अधिवेशन
गोवा विधानसभेचे अधिवेशन

पणजी - राज्यात सागरमाला व रेल्वे दुपदरीकरणाच्या माध्यमातून कोळसा वाहतुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे रेल्वेची दुपदरीकरण, महामार्ग ( Highway ) विस्तार व तामनार वीज प्रकल्प हा थ्रीलिनियेर प्रोजेक्ट ( three linear projects ) रद्द करावा, या मागणीसाठी काँग्रेसने सभागृहात ( Congress Hall ) गोंधळ घालत पावसाळी अधिवेशनाचे ( Monsoon session ) कामकाज बंद पाडले आहे. दरम्यान विरोधकांनी कोळसा नको, अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला आहे.

कोळसा वाहतुकीला चालना मिळणार - दरम्यान विरोधकांना सभागृहात चर्चा करायची नाही, म्हणून ते गोंधळ घालतात. तसेच त्यांना सभागृहाचे कामकाज सुरळीत करायचे नाही, म्हणून या सर्व गोष्टी करत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Chief Minister Pramod Sawant ) यांनी सांगितले. राज्यात सागरमाला व रेल्वे दुपदरीकरणाच्या माध्यमातून कोळसा वाहतुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे रेल्वेची दुपदरीकरण, महामार्ग ( Highway ) विस्तार व तामनार वीज प्रकल्प हा थ्रीलिनियेर प्रोजेक्ट रद्द करावा, या मागणीसाठी काँग्रेसने सभागृहात गोंधळ घालत पावसाळी अधिवेशनाचे कामकाज बंद पडले आहे. दरम्यान विरोधकांनी कोळसा नको, अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला आहे.

थ्री लिनियस प्रोजेक्टला विरोधकांनी विरोध दर्शवत अधिवेशनाचे कामकाज बंद - अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी कोळसा नको, तसेच केंद्र सरकारने येऊ घातलेल्या थ्री लिनियस प्रोजेक्टला विरोधकांनी विरोध दर्शवत अधिवेशनाचे कामकाज बंद पडले आहे. यावेळी त्यांनी कोळसा नको, अशा घोषणा देत सभागृहात सरकारला धारेवरती धरले. मात्र, विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित करत विरोधकांची मागणी फेटाळून लावली आहे.

काय आहे थ्रिलिनिअस प्रोजेक्ट - राज्यात केंद्र सरकारच्या वतीने रेल्वेचे दुपदरीकरण, मोले अभयारण्यातून जाणारी तमनार वीज प्रकल्प तसेच राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण अशा योजना राज्यात होऊ घातले आहेत. मात्र, या योजनेच्या माध्यमातून राज्यात कोळसा वाहतूक वाढेल व त्याचे दुरगामी परिणाम गोव्यातील जनतेला भोगावे लागतील. तसेच मॉले अभयारण्यातून वीज प्रकल्प घालताना अनेक झाडांची कत्तल होणार आहे. याला काँग्रेससह विरोधकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द व्हावा, अशी मागणी विधानसभेत विरोधकांनी केली होती. मात्र, या केंद्र सरकारच्या योजना असून या योजना रद्द होणार नसल्याचं सरकारने सांगितले आहे. मात्र, त्यावर विरोधकांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले आहे.

सरकारचा निषेध - दरम्यान विरोधी पक्षातील आमदार यांनी सभागृहात सभात्याग करत विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले आहे. यावेळी सरकारचा निषेध करण्यात आले. या आंदोलनात विरोधी पक्षातील काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पार्टी तसेच रिव्होल्युशनरी गोवानससे आमदार सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सरकारचा निषेध करत सरकार विरोधात घोषणाही दिल्या आहेत.

हेही वाचा - Sharad Pawar Criticized Shinde Government :...तर मी शिंदे सरकारचं अभिनंदन केलं असतं - शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.