नवी दिल्ली : गेमिंग अॅप्लिकेशनच्या माध्यमातून धर्मांतरण प्रकरणात नव-नवीन एक खुलासे होऊ लागले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी शाहनवाज उर्फ बद्दोच्या मोबाईलमध्ये 30 पाकिस्तानी नंबर मिळाले आहेत. शाहनवाज हा या नंबरवर नेहमी संपर्कात होता. युपीच्या पोलिसांनी शाहनवाजची महाराष्ट्र पोलिसांकडून ट्रान्झिट रिमांड मिळवली आहे. रिमांड मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. यातून ही बाब समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला याविषयी प्रश्न केला असता त्याने गोलमोल उत्तर दिले होते.
चॅट आणि हार्ड डिस्कमधील डेटा नष्ट : धर्मांतराचे प्रकरण 30 मेला समोर आले होते. आता याप्रकरणात नवीन बाबी समोर येत आहेत. पोलिसांनी शाहनावज याची चौकशी सुरू केली आहे. शाहनवाजकडून पोलिसांना मोबाईल आणि लॅपटॉप मिळाला होता. कॉम्युटरची हार्ड डिस्कदेखील मिळाली होती. परंतु पकडले जाणार असल्याची शक्यता त्याला वाटत असल्याने त्याने मोबाईलमधील बहुतेक डेटा डिलीट केला आहे. तसेच कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कमधील डेटाही त्याने नष्ट केला आहे. दरम्यान, सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिलीट केलेला डेटा सायबर सेलने जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी केला डेटा जप्त : पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की बद्दोला धर्मांतराशी संबंधित प्रश्न विचारला असता त्याने कोणाचेही धर्मांतर केले नसल्याचे सांगितले. त्यांच्याकडे असलेल्या पाकिस्तानी मोबाईल क्रमांकांबाबत विचारणाही पोलिसांनी केली. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला की, गुगलशी लिंक केल्यानंतर ते नंबर त्याच्या मोबाईलमध्ये आले असावेत. पोलिसांना काही YouTube चॅनलची माहिती मिळाली होती. ज्यावर आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून हे यूट्यूब चॅनल पाकिस्तानशी संबंधित आहे. पाकिस्तानातून सुरू असलेल्या यूट्यूब चॅनलबद्दल विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला की, जे कोणी त्याला व्हिडिओ लिंक मागायचे त्यांच्याशी लिंक शेअर करायचा.
पाकिस्तानशी अनेकवेळा संभाषण : जेव्हा गाझियाबादमधी कवी नगरमधील पोलिसांना एक तक्रार मिळाली होती. तक्रारीनुसार गेमिंग अॅप्लिकेशनच्या माध्यमातून जैन परिवारातील एक मुलाचे ब्रेनवाश करून त्यांचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पोलिसांनी अब्दुल रहमान नावाच्या मौलवीला अटक केली होती. दुसरीकडे पोलीस महाराष्ट्रातील ठाण्यात असलेल्या मुख्य आरोपी बद्दोपर्यंत पोहोचली. बद्दो उर्फ शाहनवाजला मंगळवारी गाझियाबाद येथे आणण्यात आले. त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांना त्यांच्याकडील लॅपटॉपमध्ये काही ईमेल आयडी सापडले आहेत. जे पाकिस्तानशी संबंधित आहेत. पाकिस्तानच्या 30 नंबरच्या संपर्कात बद्दो होता. या नंबरवर त्याने अनेकवेळा संभाषण झाले आहे. याशिवाय त्याच्या गॅजेट्समध्ये जितके ई-मेल आयडी सापडले, त्यामध्ये अनेक व्हिडिओ लिंक पाकिस्तानमध्ये शेअर करण्यात आल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, गरज पडल्यास बद्दोला पुन्हा रिमांडवर घेतले जाऊ शकते, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. मंगळवारी ट्रान्झिट रिमांड संपण्यापूर्वीच पोलिसांनी बद्दोला गाझियाबाद कोर्टात हजर केले होते. त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बद्दो सध्या गाझियाबादच्या डासना तुरुंगात कैद आहे.
हेही वाचा -