ETV Bharat / bharat

Parenting News : मुलांना रागावणे, धमकावणे म्हणजे शिस्त नव्हे; या सवयी त्वरित सुधारा - Threatening Children Is Not Discipline

मुलं आपल्या मनाप्रमाणे वागली नाही म्हणून आदळ आपट करणे, त्यांना रागावणे किंवा धमकावून शिस्त लावणे म्हणजे पालकत्व ( Threatening Children Is Not Discipline ) नाही. यातून मुल घडण्याऐवजी अधिक बिघडतात.तर पालकत्व ( Parenting ) म्हणजे नेमकं काय? याबाबत जाणून घेऊयात. ( Getting angry Threatening Children Is Not Discipline Correct These Habits Immediately )

Parenting News
पालकत्वाच्या बातम्या
author img

By

Published : Sep 15, 2022, 12:25 PM IST

मुले आपल्या मनाप्रमाणे वागली नाही म्हणून आदळ आपट करणे, त्यांना रागावणे किंवा धमकावून ( Threatening Children Is Not Discipline ) शिस्त लावणे म्हणजे पालकत्व ( Parenting ) नाही. यातून मुले घडण्याऐवजी अधिक बिघडतात. जीवनात शिस्त व वक्तशिरपणा (Dicipline) ह्या दोन महत्वाच्या गोष्टी असतात. यातून माणसाचे उज्वल भविष्य व व्यक्तीमत्व घडत असते. त्यामुळे अगदी लहानपणापासून आपणास शिस्त लावण्याचा प्रयत्न आपल्या घरातील मोठ्यांकडून होत असतो. त्यामुळे शिस्तीचे महत्व अगदी लहान वयापासून आपणाला कळायला लागत असते. ( Getting angry Threatening Children Is Not Discipline Correct These Habits Immediately )

Parenting News
मुलांना रागावणे, धमकावणे म्हणजे शिस्त नव्हे

शिस्त लावण्याच्या प्रयत्नात मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावतोय का? - घरातील संस्कार व त्यानंतर शाळेत किंवा महाविद्यालयात गेल्यावरही वागण्याची शिस्त, बोलण्याची शिस्त, बसण्याची शिस्त आदी सर्व जीवनच शिस्तीभोवती फिरत असते. त्यामुळे आपण अनेकदा पालकत्वामध्ये (Parenting) ओढून ताणून शिस्तीला आणत असतो. आपल्या पाल्यानेही शिस्तीतच सर्व गोष्टी कराव्यात असा आपला कल असतो. निर्विवादपणे शिस्तीला महत्व आहेच परंतु, काही वेळा याचा अतिरेक होत असतो. शिस्त लावण्याच्या प्रयत्नात आपण लहान मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावतोय का? हा विचार प्रत्येक पालकाने आता करण्याची वेळ आली आहे.

मुलांना वारंवार रागावण्यापेक्षा त्यांना चांगले वागणे शिकवावे - मुलांना रागावणे, धमकावणे (Bullying) तसेच आदळ आपट करुन आपले म्हणणे त्यांच्यावर लादणे म्हणजे शिस्त नाही. तर त्यांच्या भावना समजून चर्चेतून त्यांची समजूत घालून चांगल्या वाईटाची जाणीव करुन देणे म्हणजे पालकत्व असते. मुलांना शिस्त शिकवण्यात अनेक लोक चुका करतात. मुलांना काहीही शिकवण्यापूर्वी पालकांनी स्वत:मधील काही गोष्टी सुधारायला हव्यात. मुले जे पाहतात तेच शिकतात. अशा परिस्थितीत तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवले तरच मुल त्यातून काही बोध घेतील. मुलांना शिस्त शिकवणे खूप महत्वाचे आहे. शिस्तीमुळे मुलांच्या सवयी सुधारतात. मुलांना वारंवार रागावण्यापेक्षा त्यांना चांगले वागणे शिकवावे. जीवनात शिस्त खूप महत्त्वाची आहे पण बरेच लोक मुलांवर शिस्त लादायला सुरुवात करतात, त्यामुळे मुले शहाणे होण्याऐवजी अधिकच बिघडू लागतात.

मुलांशी संवाद साधा - अनेकदा आई वडिल व पाल्य यांच्यात संवादच होत नाही. त्यामुळे त्यांच्यातील दरी अधिकच खोल होत असते. आधीच दोघांमध्ये वयाचे बरेच अंतर असल्याने यातून मतभेद, दोन टोकांची विचारसरणी आदी समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे मुलांसोबत जास्तीत जास्त संवाद साधणे आवश्‍यक असते. यातून त्यांच्या मनातील भावना पालकांना समजतात. व याचा परिणाम म्हणून दोघांमधील नाते अजून घट्ट होण्यास मदत मिळत असते. त्यामुळे संवाद साधणे हा मुलांना शिस्त लावण्यासाठीचा एक चांगला मार्ग म्हणता येईल.

मुलांचे निरीक्षण करा - मुलांना सतत धाकात ठेवण्यापेक्षा मुलांचे सतत निरीक्षण केले पाहिजे. त्यांचे वागणे, बोलणे, एखाद्या विषयाची त्यांची गोडी, तसेच एखाद्या गोष्टीचा तिटकारा आदींचा अभ्यास करुन त्यांचा कल कोणत्या दिशेने आहे याची पाहणी केली पाहिजे. आपल्या मुलाला कोणत्या गोष्टींमध्ये रस आहे, कुठल्या गोष्टी तो आवडीने करतोय, याचे निरीक्षण होणे गरजेचे असते. तसेच पालकांनी स्वत:च्या भावनांना आवर घालणे महत्वाचे असते. आपली मते मुलांवर लादण्यापेक्षा त्यांच्याही मताचा आदर करायला शिकले पाहिजे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.