ETV Bharat / bharat

जीईई मेन्सची चौथ्या टप्प्यातील परीक्षेची बदलली तारीख; धर्मेंद्र प्रधान यांची माहिती - JEE-Main Exam Postponed

जीईई मेन्सची चौथ्या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे.

धर्मेंद्र प्रधान
धर्मेंद्र प्रधान
author img

By

Published : Jul 15, 2021, 10:05 PM IST

नवी दिल्ली - अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन्सची चौथ्या टप्प्यातील परीक्षा (JEE Main Exam Postponed) स्थगित करण्यात आली आहे. ही परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या परीक्षांकरिता चार आठवड्यांचा पुरेसा वेळ मिळण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जीईई मेन्सची चौथ्या टप्प्यातील परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटमध्ये म्हटले, की विद्यार्थी वर्गाकडून करण्यात येणारी मागणीमुळे राष्ट्रीय चाचणी संस्थेने जेईई मेन्स परीक्षा 2021च्या दोन टप्प्यांमध्ये चार आठवड्यांचे अंतर ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे जेईई मेन्स 2021 परीक्षेचा चौथा टप्पा हा 26, 27,31 ऑगस्ट व 1 व 2 सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे.

हेही वाचा-एटीएममधून पैसे नव्हे, घ्या धान्य; हरियाणाची देशात पहिल्यांदाच अभिनव योजना

जेईई मेन्स 2021 परीक्षेच्या चौथ्या टप्प्याकरता 7.22 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जीईई मेन्सच्या चौथ्या टप्प्याकरिता नोंदणी सुरू आहे. ही नोंदणी तयार करण्याची मुदत 20 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

हेही वाचा-कमलनाथ काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष होणार?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.