रांची : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपुढे वैद्यकीय यंत्रणा अगदी हतबल झाली आहे. देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यातच विविध राज्यांमध्ये ऑक्सिजन पुरवण्यासाठी विशेष 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' सुरू करण्यात आल्या आहेत. यातच झारखंडमधून पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस आज सकाळी मध्य प्रदेशसाठी रवाना होणार आहे.
जबलपूरहून भोपाळला जाणाऱ्या या रेल्वेमध्ये सहा ऑक्सिजन टँकर असणार आहेत. हे टँकर भोपाळला रिकामे केल्यानंतर त्याच गाडीने पुन्हा बोकारोला नेण्यात येणार आहेत; जिथे पुन्हा त्यांमध्ये ऑक्सिजन भरण्यात येईल. रेल्वे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
मध्ये प्रदेशला पाठवले रेल्वेचे आयसोलेशन कोच..
मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. सध्या राज्यात ९१ हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. रुग्णालयांमध्ये ताण येऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने २० आयसोलेशन कोच असणाऱ्या रेल्वे मध्य प्रदेशला पाठवण्यात आहेत.
ऑक्सिजन एक्स्प्रेस छत्तीसगडहून पोहोचली दिल्लीला..
दरम्यान, दुसरी एक ऑक्सिजन एक्स्प्रेस छत्तीसगडच्या रायगडमधून दिल्लीच्या कॅन्ट परिसरात पोहोचली आहे.
हेही वाचा : छत्तीसगडमध्ये रविवारी 12 हजार रुग्ण कोरोनाबाधित, 190 मृत्यू