ETV Bharat / bharat

Rapist Father Punishment Uttarakhand डेहराडूनमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला २६ वर्षांची शिक्षा, एक लाखाचा दंड - Father sentenced 26 years

राजधानी डेहराडूनच्या विशेष पॉक्सो न्यायालयाच्या ( Dehradun POCSO court )न्यायाधीश मीना देउपा यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार ( Minor girl rape Deharadun ) केल्याप्रकरणी दोषी वडिलांना 26 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा Convicted father sentenced rigorous imprisonment सुनावली. ही घटना २०१९ सालची आहे.

मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला २६ वर्षांची शिक्षा

author img

By

Published : Sep 6, 2022, 1:50 PM IST

डेहराडून (उत्तराखंड) : राजधानी डेहराडूनच्या विशेष पॉक्सो न्यायालयाच्या (Dehradun POCSO court) न्यायाधीश मीना देउपा यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार ( Minor girl rape Deharadun ) केल्याप्रकरणी दोषी वडिलांना 26 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ( Convicted father sentenced rigorous imprisonment ) सुनावली. यासोबतच न्यायालयाने दोषींना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागेल असेही फर्मावले.

पीडित बहिणीसाठी भावाची वडिलांविरुद्ध तक्रार - 2019 मध्ये एका तरुणाने त्याच्या वडिलांविरोधात सहसपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती की, त्याच्या वडिलांनी आपल्या बहिणीसोबत गैरकृत्य केले. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा जबाब घेतला असता, आरोपी चार वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करत असल्याचे तिने सांगितले. रात्री झोपताना तो तिच्याशी गैरवर्तन करतो. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.

अखेर वडिलाच्या हातात पडल्या बेड्या - मुलीची आई 4 वर्षांपूर्वी घर सोडून गेली होती. अल्पवयीन मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली. सरकारी वकील जया ठाकूर यांनी सांगितले की, न्यायालयात खटल्यात 9 साक्षीदार हजर झाले. साक्षीदारांची साक्ष आणि पुराव्यांच्या आधारे दोषीला 25 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच एक लाख रुपयांच्या दंडापैकी 80 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय खटल्यात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणीही न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. अशा प्रकारे या कलियुग पित्याला 26 वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.