ETV Bharat / bharat

शेतकरी आंदोलन : देशभरात पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेचे दहन करणार - दिल्ली मार्च

५ डिसेंबरला देशभरात पंतप्रधान मोदींची प्रतिमा दहन करणार आहोत. आठ डिसेंबरला भारत बंदची हाक दिल्याचे भारतीय किसान युनियनचे महासचिव एच. एस लखोवाल यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषद घेत सांगितले.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 4, 2020, 6:11 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आज (शुक्रवार) दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. कृषी कायदे रद्द करण्याच्या आमची मागणी असून त्याशिवाय दुसरी चर्चा सरकारबरोबर होणार नाही, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. उद्या देशभरात पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार, केंद्रीय नेते आणि बड्या उद्योगपतींच्या प्रतिमेचे दहन करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आठ डिसेंबरला देश बंदची हाक

दिल्लीमध्ये केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काल सरकारशी चर्चा झाल्यानंतर आज शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. कृषी कायदे सरकारने रद्द करावे, असे आम्ही सरकारचा ठामपणे सांगितल्याचे शेतकरी नेते म्हणाले. ५ डिसेंबरला देशभरात पंतप्रधान मोदींची प्रतिमा दहन करणार आहोत. आठ डिसेंबरला भारत बंदची हाक दिल्याचे भारतीय किसान युनियनचे महासचिव एच. एस लखोवाल यांनी दिल्लीच्या सिंघू सीमेवर पत्रकार परिषद घेत सांगितले.

कायदा रद्द करणार की नाही, फक्त यावर चर्चा

कृषी कायदे रद्द करावे ही आंध्रप्रदेश तेलंगणा मधील शेतकऱ्यांचीही मागणी आहे. या राज्यांत अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. उद्या मोदी सरकार आणि मोठ्या व्यावसायिकांच्या प्रतिमा दहन करण्यात येणार आहेत. शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनीही आंदोलनात सहभागी करून घेणार आहोत. त्यासाठी सायकल रॅलीसह इतर कार्यक्रम करण्यात येत आहेत. ही लढाई संपूर्ण देशाची आहे. तोडा आणि फोडाचे राजकारण चालू देणार नाही. आम्ही मोठ्या विजयाकडे दौड करत आहोत. यात सरकारची हार होत आहे. कायदा रद्द करणार की नाही, फक्त यावरच उद्या चर्चा होणार. आम्ही हे आंदोलन पुढे घेवून जाणार आहोत. सरकारला कायदे माघे घ्यावे लागतील असे हनान मोलाह, महासचिव, ऑल इंडिया किसान सभा यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.