ETV Bharat / bharat

तुमचं जेवण आम्हाला नकोयं, सरकारसोबतच्या बैठकीत शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा - Farmer leaders rejects food

विज्ञान भवन येथे शेतकरी नेते आणि केंद्र सरकामध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, जेवणासाठी बैठक काही काळ थांबविण्यात आली आहे. यावेळी शेतकरी नेत्यांनी सरकारने देऊ केलेले चहा आणि जेवण नाकारले.

शेतकरी नेते
शेतकरी नेते
author img

By

Published : Dec 3, 2020, 4:17 PM IST

नवी दिल्ली - विज्ञान भवन येथे शेतकरी नेते आणि केंद्र सरकामध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, जेवणासाठी बैठक काही काळ थांबविण्यात आली आहे. यावेळी शेतकरी नेत्यांनी सरकारने देऊ केलेले चहा आणि जेवण नाकारले. शेतकरी नेत्यांनी स्वत:चे अन्न बरोबर आणल्याचे सांगितले. अद्याप सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून काहीही तोडगा निघालेला नाही.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपला पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे. त्यांच्यासोबत शिरोमणी अकाली दलाचे (डेमोक्रॅटिक) प्रमुख आणि राज्यसभा खासदार सुखदेव सिंग धिंदसा यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारचा निषेध म्हणून पद्मभूषण पुरस्कार माघारी करण्याची घोषणा केली आहे.

लवकरात लवकर तोडगा काढावा

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही शेतकरी आंदोलनावर मत व्यक्त केले आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. यामध्ये माझी काहीही भूमिका नाही. कृषी कायद्यांना माझा विरोध मी केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगितला आहे, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची मी त्यांना विनंतीही केली आहे. माझे राज्य, देशाची अर्थव्यवस्था आणि सुरक्षा या सर्वांवर हे परिणाम करते, त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा निघणे आवश्यक आहे असे कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले.

यापूर्वी मंगळवारीही शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारशी चर्चा केली होती. ही बैठक सकारात्मक झाल्याचे तोमर यांनी म्हटले होते. यानंतर आज होणाऱ्या बैठकीत कृषी कायद्यांमधील ठराविक मुद्द्यांवर चर्चा व्हावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

महाराष्ट्रातही आंदोलन

दरम्यान, शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीकडे रवाना होत आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसोबतच आता ओडिशा आणि मध्य प्रदेशचे शेतकरीही दिल्लीकडे कूच करत आहेत. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही दिसत आहेत. राज्यमंत्री बच्चू कडूंनी आंदोलनासाठी दिल्लीला जाण्याचा इशारा दिला आहे. तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आज (गुरुवार) आत्मक्लेश आंदोलन करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.