ETV Bharat / bharat

काश्मीर हादरले! दहशतवाद्यांकडून काश्मिर पंडितासह तीन जणांची हत्या - जम्मू काश्मीर दहशतवादी गोळीबार

काश्मीरमध्ये संशयित दहशतवाद्यांनी तीन नागरिकांची हत्या केली आहे. या हत्येमुळे काश्मीर खोरे हादरून केले आहे. आरोपींना अटक करण्याची काश्मीर भाजपकडून मागणी करण्यात येत आहे.

दहशतवाद्यांकडून काश्मिर पंडितासह तीन जणांची हत्या

author img

By

Published : Oct 5, 2021, 11:39 PM IST

श्रीनगर - दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा क्रुरतेचा गळस गाठला आहे. दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात तीन जणांची हत्या केली आहे. यामध्ये लोकप्रिय असलेल्या मखन लाल बिंदू या काश्मीर पंडिताचाही समावेश आहे. त्यांची दहशतवाद्यांनी इक्बाल पार्कमध्ये हत्या केली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार अज्ञात दहशतवाद्यांनी इक्बाल पार्कमधील बिंदू मेडिकेअर या प्रसिद्ध मेडिकलचे मालक पंडित मखन लाल बिंदू यांची हत्या केली. गंभीर जखमी झालेल्या बिंदू यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत होते. वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. श्रीनगरमधील हरी सिंग रस्त्यावर असलेल्या दुकानातच त्यांची हत्या करण्यात आली होती. सुरक्षा दल हे घटनास्थळी पोहोचले होते.

हेही वाचा-lakhimpur Violence : संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधींची भेट, म्हणाले विरोधकांनी एकत्र येण्याची गरज

बिहारमधील फेरीवाल्याची हत्या

मंगळवारी रात्री लालबझार भागातील मदिना चौकात फेरीवाल्याची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार रात्री ८ वाजता संशयित दहशतवाद्यांनी फेरीवाल्यावर हल्ला केला. यावेळी जागेवरच फेरीवाल्याचा मृत्यू जाला. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून तपास सुरू आहे. मृत फेरीवाल्याची ओळख पटली आहे. विरेंदर पासवान असे या फेरीवाल्याचे नाव आहे. तो बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. पासवान हे श्रीनगरमधील अलमगिरी बाजार येथे राहत होते. हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाने विशेष मोहिम सुरू केली आहे.

हेही वाचा-अपघातातील जखमींना रुग्णालयात पोहोचवा आणि मिळवा 5000 रुपये; केंद्र सरकारची नवी योजना

हत्येची तिसरी घटना

काही तासात अज्ञात हल्लेखोरांनी उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीनमध्ये एका नागरिकाला गोळ्या घालून ठार केले.

हेही वाचा-गांधीनगर पालिका निवडणुकीत भाजपचा विजय, 44 पैकी जिंकल्या 41 जागा

भाजपकडून आरोपींच्या अटकेची मागणी

भाजपचे राज्य प्रभारी अल्ताफ ठाकूर यांनी बिंदू यांच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला. बिंदू हे शांत स्वभावाचे आणि नेहमीच लोकांची काळजी घेणारे होते. निशस्त्र व्यक्तीवर हल्ला करणाऱ्यांना कोणताही धर्म नाही. धर्माच्या नावावर हत्येचे कधीही समर्थन करता येणार नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना पकडून अटक करावी, अशी विनंती असल्याचे अल्ताफ ठाकूर यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.