ETV Bharat / bharat

Grill Lock On Grave : पाकिस्तानमध्ये बलात्कार रोखण्यासाठी कबरीवर लोखंडी जाळीचे कुलूप लावल्याचा दावा; फॅक्ट चेकमध्ये हे सत्य झाले उघड - ग्रिल लॉक असलेली कबर

पाकिस्तानमधील कबरीवर लोखंडी कुलूप लावल्याचा फोटो सध्या सोशल माध्यमात व्हायरल होत आहे. मुलींवरील बलात्कर रोखण्यासाठी कबरीवर हे कुलूप लावल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र हा दावा खोटा निघाला असून ती कबर हैदराबादची निघाली आहे.

Grill Lock On Grave
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 1, 2023, 8:40 AM IST

Updated : May 1, 2023, 9:44 AM IST

हैदराबाद : बलात्कार रोखण्यासाठी पाकिस्तानमधील कबरींवर लोखंडी जाळीचे कुलूप लावल्याचा दावा सोशल माध्यमात करण्यात आला होता. एका वृत्तसंस्थेनेही याबाबत वृत्त प्रसारित केले होते. मात्र हा दावा सपशेल खोटा असल्याचे पुढे आले आहे. तो फोटो पाकिस्तानमधील नसून हैदराबादेतील असल्याचे फॅक्ट चेकमध्ये उघड झाले आहे. त्यामुळे बलात्कार टाळण्यासाठी पाकिस्तानमधील कबरीवर लोखंडी जाळी लावण्यात येत असल्याचा दावा खोटा निघाल्याने सोशल माध्यमात याबाबत तुफान चर्चा सुरू आहेत.

  • This Grave is in India not from Pakistan.

    It is in DarabJung Colony, Madannapet, Hyderabad, Telangana

    And a lock has been put on this grave so that no one should bury someone else in this grave. pic.twitter.com/p1WaUlwDcf

    — زماں (@Delhiite_) April 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाकिस्तानी लेखकाने केले होते ट्विट : 'पाकिस्तानी पालक मुलींच्या कबरींना बलात्कार टाळण्यासाठी बंद करतात' या मथळ्यासह एएनआय न्यूज एजन्सीने 29 एप्रिलला एक वृत्त प्रसारित केले होते. मात्र हे वृत्त पाकिस्तानमधील वादग्रस्त नास्तिक लेखक हॅरिस सुलतानच्या ट्विटचा हवाला देत करण्यात आले होते. हॅरिस यांनी देखील हाच फोटो शेअर केला होता. पाकिस्तानमध्ये एक कबर आहे. पालकांनी त्यांच्या मुलींवर बलात्कार होऊ नये, म्हणून त्यांच्या कबरीवर कुलूप लावले आहे, असा दावा लेखक हॅरिस यांनी केला होता.

मूळ चित्र हैदराबादमधील कबरीचे : या फोटोत एक ग्रिल लॉक असलेली कबर दिसत आहे. पाकिस्तानी पालक त्यांच्या मुलींच्या अवशेषांचे संरक्षण करण्यासाठी ही पद्धत वापरतात असा दावा या अहवालात करण्यात आला होता. एका वृत्तसंस्थेने वृत्त प्रसारित केल्यानंतर बराच गोंधळ उडाला. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे उघड झाले आहे. कबरीचे हे चित्र मूळचे हैदराबादचे असल्याचे समोर आले आहे. त्याचा दावा खोडून काढल्यानंतर हॅरिसने त्याचे ट्विट हटवले आहे.

हैदराबादच्या मदनापेटची निघाली कबर : अनेक प्रसारमाध्यमांनी एएनआयची बातमी दिली होती. ही कबर हैदराबादच्या मदनापेट येथील दरब जंग कॉलनीतील स्मशानभूमीतील आहे. ही कबर पाकिस्तानची नाही तर भारतात असल्याचे उघड झाले आहे. या कबरीत कोणीही दुसऱ्याला दफन करू नये म्हणून या कबरीला कुलूप लावण्यात आले आहे, असे एका वापरकर्त्याने ट्विट केले आहे. ट्विटर वापरकर्त्याने कब्रस्तानजवळील स्थानिक मशिदीच्या काळजीवाहू व्यक्तीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यात कबरीचे मूळ कारण स्पष्ट केले असून ही कबर सुमारे 1.5 ते 2 वर्षे जुनी आहे. ती मस्जिद समितीच्या परवानगीशिवाय बांधण्यात आली आहे. ती प्रवेशद्वाराच्या अगदी समोर असल्यामुळे स्मशानभूमीत जाण्याच्या मार्गात अडथळे येत आहेत.

म्हणून कुटूंबांनी लावली जाळी : बरेच नागरिक येथे येऊन परवानगीशिवाय जुन्या कबरींवर मृतदेह दफन करतात. त्यांचे जवळचे नागरिक येथे विश्रांती घेत असल्याने ते येथे नमाज पठण करण्यासाठी येतात. त्यामुळे इतरांनी कोणतेही मृतदेह पुरू नयेत, म्हणून कुटुंबांनी त्यावर लोखंडी जाळी लावल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे.

हेही वाचा - निकाल सुनावताना न्यायाधीशांचे खडे बोल! म्हणाले, मुख्तारला गुन्हेगार बनवण्यात अफजलचा हात; मोठ्या भावाचे कर्तव्य निभावले नाही

Last Updated : May 1, 2023, 9:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.