हैदराबाद - फेसबुक पुढच्या आठवड्यात स्वतःला नवीन नावाने पुन्हा ब्रँड करण्याचा विचार करत असल्याचा अहवाल 'द व्हर्ज'ने मंगळवारी दिला. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग 28 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या वार्षिक कनेक्ट कॉन्फरन्समध्ये नाव बदलण्याविषयी बोलण्याची योजना आखत आहेत. परंतु ते लवकरच अनावरण केले जाऊ शकते, असाही अहवाल द व्हर्जने दिला.
मेटावर्स नावाची कंपनी स्थापन -
फेसबुक इंक कंपनीला एका नव्या नावाने ब्रँड करण्याची योजना सुरू आहे. गुगलने 2015 मध्ये शोध आणि जाहिरात व्यवसायाच्या पलीकडे विस्तार करण्यासाठी, त्याच्या स्वायत्त वाहन युनिट आणि आरोग्य तंत्रज्ञानापासून दुर्गम भागात इंटरनेट सेवा पुरवण्यापर्यंतच्या विविध उपक्रमांची देखरेख करण्यासाठी एक होल्डिंग कंपनी म्हणून अल्फाबेट इंकची स्थापना केली. तसेच फेसबुकने मेटावर्स नावाच्या एका नवीन प्रकल्पाची घोषणा केली होती. मेटावर्स हा शब्द वर्च्यूअल रियालिटी आणि ऑर्गुमेंट रियालिटी संदर्भात आहे. यामध्ये युझर्स आभासी पद्धतीने सहभागी होऊ शकतात.
इतर सोशल माध्यमांची नाव बदल्याण्याची चर्चा -
फेसबुकने व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. आणि त्याच्या जवळपास तीन अब्ज वापरकर्त्यांना अनेक उपकरणे आणि अॅप्सद्वारे जोडण्याचा त्यांचा मानस आहे. मेटावर्स तयार करण्यात मदत करण्यासाठी पुढील पाच वर्षांमध्ये युरोपियन युनियनमध्ये 10 हजार नोकऱ्या निर्माण करण्याच्या कंपनीने मंगळवारी योजना देखील जाहीर केल्या. अहवालानुसार, फेसबुकशिवाय कंपनीचे इन्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ऑक्यूल्स यासारख्या नावांबाबत मोठी घोषणा होऊ शकते. असे असले तरी फेसबुककडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.