नवी दिल्ली: गृहराज्यमंत्री मिश्रा यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलेकी, भारतात सध्या एकूण 4 हजार 926 परदेशी कैदी आहेत, त्यापैकी 1,140 जणांवर दोष निश्चित झालेले आहेत.आणि 3,467 जनांवर खटले सुरु आहेत. अशा कैद्यांची सर्वाधिक संख्या पश्चिम बंगाल (1295) तुरुंगात आहे, त्यानंतर दिल्ली (400), महाराष्ट्र (380), उत्तर प्रदेश (290), कर्नाटक (155) आणि हिमाचल प्रदेश (119) च्या तुरुंगात आहे. परदेशी वंशाच्या कैद्यांमध्ये सर्वाधिक बांगलादेश (1630), त्यानंतर नायजेरिया (615), नेपाळ (463), म्यानमार (152), नायजेरिया (114) आणि पाकिस्तान (114) व्यतिरिक्त (107) आफ्रिकन तर कॅनडा आणि चीनमधील प्रत्येकी 14 कैदी आहेत.
मिश्रा म्हणाले की केंद्र सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षात परदेशी वंशाच्या कैद्यांवर 2018.48 कोटी रुपये खर्च केले आहेत त्यापैकी 1004.98 कोटी रुपये जेवणावर खर्च केले आहेत. यातील बहुतांश कैदी हे पासपोर्ट आणि व्हिसाचे उल्लंघन आणि अंमली पदार्थांच्या संदर्भात तुरुंगात आहेत. 11 दोषी परदेशी वंशाच्या कैद्यांना त्यांची शिक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या संबंधित देशांमध्ये परत पाठवण्यात आले आहे. केंद्र सरकारने 31 देशांसोबत अशी व्यवस्था केली आहे ज्यात भारतात दोषी ठरलेले परदेशी लोक त्यांच्या स्वतःच्या देशात त्यांची शिक्षा भोगू शकतात.
हेही वाचा : Government's Reply : फौजदारी कायद्यातील सुधारणांची प्रक्रिया सुरू: गृह मंत्रालय