- आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी विविध राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस आरोग्य खात्याचे सचिव, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य मंत्री राजेश टोपे हेदेखील असणार आहेत.
- जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
- पुणे श्रमिक पत्रकार संघाने काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्याशी चर्चा आयोजित केली आहे. ते चर्चेत काय बोलणार याकडे असेल लक्ष.
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखच्या यांच्या जामीन अर्जावर आज मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
- बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे दोघेही आज विवाह बंधनात अडकणार आहेत.
- कालच्या महत्वाच्या बातम्या -
- नवी दिल्ली - माजी लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या हेलिकॉप्टरमधून (Army Chopper Crash) बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. यावेळी दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्यासह या दुर्घटनेत एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सविस्तर वाचा ...
- नवी दिल्ली - हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला आज तामिळनाडूत अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत हे होते. या अपघातात बिपिन रावत यांच्यासह इतर 12 लष्कर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक होते. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम बिपिर रावत यांच्याकडे होते. सविस्तर वाचा ...
- पुणे - सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ( SII ) कार्यकारी संचालक व कॉविशिल्ड लस निर्मितीत महत्त्वाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश जाधव यांचे बुधवारी (दि. 8 डिसेंबर) पुण्यात निधन झाले. डॉ. जाधव हे 72 वर्षांचे होते. सिरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरील कोव्हिशील्ड वॅक्सीन ( Covishield Vaccine ) तयार करण्यात डॉ. जाधव यांचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सविस्तर वाचा ...
- मुंबई - जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण ( Omicron Patients ) आढळून येत आहेत. राज्यात डोंबिवली, मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे आतापर्यंत ओमायक्रॉनचे १० ( Omicron 10 patients ) रुग्ण आढळून आले आहेत. मात्र आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान नागरिकांनी भीती बाळगू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून ( Health Department ) करण्यात आले आहे. सविस्तर वाचा ...
- नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टी-20 नंतर एकदिवसीय कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील वनडे मालिकेत रोहित शर्मा कर्णधार असेल. त्याची अधिकृत घोषणाही या दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या घोषणेदरम्यानच होऊ शकते. सविस्तर वाचा ..
- जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -