ETV Bharat / bharat

तिसऱ्या दिवशी राहुल गांधींची चौकशी, काँग्रेस कार्यालयात पोलीस घुसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप

नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ईडीकडून सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे. ( ED questions Rahul over AJL stocks ) तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांना काँग्रेस मुख्यालयात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काँग्रेस नेते जितेंद्र सिंह यांनी ट्विट करून पोलिसांच्या कारवाईला लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Jun 15, 2022, 7:16 PM IST

नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालय (ED) 'नॅशनल हेराल्ड' या वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात येत आहे. ( National Herald opinion ) ईडीने मंगळवारी त्यांची 11 तास आणि सोमवारी 10 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. तर, दुसरीकडे काँग्रेस नेत्यांना काँग्रेस मुख्यालयात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • आजाद भारत में पहली बार देश के प्रमुख विपक्षी दल कॉंग्रेस पार्टी के मुख्यालय में पुलिस द्वारा अन्दर घुस कर लाठीचार्ज करना तथा कार्यकर्ताओं को मारते हुए उठा कर ले जाना बेहद शर्मनाक एवं कायरतापूर्ण कार्यवाही है I पुलिस का बीजेपी के गुंडों के रूप कार्य करना लोकतंत्र की हत्या है I https://t.co/YiiLq811iE

    — Jitendra Singh Alwar (@JitendraSAlwar) June 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेस कार्यालयात पोलीस घुसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. यादरम्यान बाचाबाचीही झाली. काँग्रेस नेते जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. याला त्यांनी लोकशाहीची हत्या म्हटले आहे. ( ED questions Rahul Gandhi ) स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात घुसून पोलिसांनी लाठीचार्ज करून कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे अत्यंत लज्जास्पद आणि भ्याड कृत्य आहे असही ते म्हणाले आहेत.

राहुल गांधी मध्य दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम रोडवर असलेल्या ईडी मुख्यालयात सकाळी 11.35 वाजता सीआरपीएफ जवानांच्या 'झेड+' श्रेणीच्या सुरक्षेसह पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा देखील होत्या. प्रियंका गांधी राहुल यांन ईडी कार्यालयात पोहचवल्यानंतर त्या घरी गेल्या.

फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या कार्यालयाभोवती पोलीस आणि निमलष्करी दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. फौजदारी दंड संहिता (CRPC)च्या कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. ईडीने मंगळवारी काँग्रेस नेत्याची 11 तास आणि सोमवारी 10 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. तपास यंत्रणेने राहुल गांधी यांनाही आज हजर राहण्यास सांगितले होते.

हेही वाचा - शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी - विरोधी पक्षांच्या बैठकीत शिवसेनेची आग्रही भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.