ETV Bharat / bharat

Driver Ran Over Man In Mirzapur : मोदी योगीवरून वाद, ड्रायव्हरने रागाच्या भरात चढवली गाडी! - मोदी योगी वादावरून हत्या

मिर्झापूरमध्ये एका ड्रायव्हरने किरकोळ वादातून एकाची हत्या केली. लग्न आटोपून परतत असताना ड्रायव्हर आणि वराच्या काकांमध्ये मोदी आणि योगी यांच्यावरून वाद झाला. यानंतर रागाच्या भरात ड्रायव्हरने त्यांच्यावर गाडी चढवत त्यांची हत्या केली.

Driver Ran Over Man In Mirzapur
मिर्झापूरमध्ये ड्रायव्हरने गाडी चढवली
author img

By

Published : Jun 12, 2023, 5:38 PM IST

मिर्झापूर (उत्तर प्रदेश) : मिर्झापूर - प्रयागराज रस्त्यावरील विंध्याचल पोलीस स्टेशन हद्दीतील महोखर गावाजवळ एका ड्रायव्हरने बोलेरो गाडीत बसलेल्या वराच्या काकांची हत्या केली. या घटनने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह ठेवून मिर्झापूर - प्रयागराज महामार्ग रोखून धरला. संतप्त नातेवाईकांनी आरोपी ड्रायव्हरच्या अटकेची मागणी केली आहे.

चालकावर गुन्हा दाखल : घटनास्थळी पोहोचलेले न्यायाधिकारी परमानंद कुशवाह यांनी गावकरी व कुटुंबीयांची तासभर समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना कारवाईचेही आश्वासन दिले. मात्र, नातेवाइकांनी ते मान्य केले नाही. माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा अधिकारी शिवप्रताप शुक्ला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत प्रजापती घटनास्थळी पोहोचले. कुटुंबीयांची समजूत घातल्यानंतर त्यांनी त्यांची तक्रार घेऊन कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाइकांनी रस्ता मोकळा केला. सध्या पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावरील जाममुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मोदी आणि योगी यांच्यावरून वादावादी झाली : कोलाही गावात राहणारे राजेशधर दुबे (50) हे त्यांचा भाऊ राकेश धर दुबे यांच्या मुलाच्या लग्नासाठी मिर्झापूरला गेले होते. ते सकाळी लग्न करून परत येत होते. त्यांच्या बोलेरो कारमध्ये 5 जण बसले होते. काही वऱ्हाडी वाटेत उतरले. या दरम्यान ड्रायव्हर आणि राजेशधर दुबे यांच्यात मोदी आणि योगी यांच्यावरून राजकीय वादावादी सुरू झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या ड्रायव्हरने राजेशधर दुबे यांना खाली खेचले. राजेशधर दुबे याने ड्रायव्हरला आपण जाऊ देणार नसल्याचे सांगितले. यावर ड्रायव्हरने राजेशधर यांच्यावर वाहन चढवले आणि त्यांना काही अंतरापर्यंत खेचून तेथून पळ काढला. या घटनेत राजेशधर दुबे यांचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा :

  1. UP Crime News : भुतांचा छडा लावणारा पोलीस अधिकारीच निघाला दरोडेखोर, गुजराती व्यावसायिकांकडून उकाळले 1.4 कोटी; 7 पोलीस कर्मचारी निलंबित
  2. Mumbai Crime News : मजुराने डोक्यात हातोडा मारून केला दुसऱ्या मजुराचा खून
  3. Thane Crime News : 'मोबाईल जिहाद' मास्टर माईंड शाहनवाज पोलिसांच्या जाळ्यात, अलिबाग येथून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.