धनबाद - झारखंडमधील धनबादमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली ( terrible accident ) आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीत कोसळल्याने पाच जणांचा झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 1 बालक, दोन महिलांसह एकूण 5 जणांचा समावेश आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. गोविंदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंद हॉटेलजवळ ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा एक रांचीहून धनबादकडे जात असताना कारचा वेग जास्त असल्याने चालकाचा तोल गेला आणि कार नदीत पडली. माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची गर्दी झाली.स्थानिक लोकांच्या माहितीवरुन पोलीस तेथे पोहोचले आणि क्रेनच्या मदतीने गाडी बाहेर काढली. मात्र कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला. सध्या स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. अलीकडेच झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील मनिका पोलीस स्टेशन हद्दीतील डोमुहान नदीजवळ NH 75 वर बस आणि ट्रकमध्ये भीषण टक्कर झाली होती. या अपघातात ट्रकमधील चालकाचा मृत्यू झाला होता, तर 25 जण गंभीर जखमी झाले होता.