ETV Bharat / bharat

Changemakers डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या अथक प्रयत्नांनी भारतात श्वेत क्रांती उदयास आली - Changemakers

डॉक्टर वर्गीस कुरियन Verghese Kurien यांना श्वेत क्रांतीचे जनक मानले जाते Father of the White Revolution . 13 जानेवारी 1970 रोजी देशात श्वेत क्रांतीला सुरूवात झाली. भारतातील दुधाच्या टंचाईवर मात करण्यासाठी भारताची योजना होती. त्याला श्वेतक्रांती असेही म्हणतात White Revolution . डेअरी फार्मिंग किंवा डेअरी इंडस्ट्री किंवा दूध उद्योग ही शेतीची एक श्रेणी आहे. हा पशुपालनाशी संबंधित एक अतिशय लोकप्रिय व्यवसाय आहे. ज्या अंतर्गत दूध उत्पादन त्याची प्रक्रिया आणि किरकोळ विक्रीसाठी काम केले जाते.

Verghese Kurien
डॉक्टर वर्गीस कुरियन
author img

By

Published : Aug 13, 2022, 11:03 AM IST

मुंबई डॉ. वर्गीस कुरियन ( Verghese Kurien ) यांना श्वेत क्रांतीचे जनक मानले जाते ( Father of the White Revolution ) . 13 जानेवारी 1970 रोजी देशात श्वेत क्रांतीला सुरूवात झाली. भारतातील दुधाच्या टंचाईवर मात करण्यासाठी भारताची योजना होती ( India face Milk shortage ). त्याला 'श्वेतक्रांती' असेही म्हणतात ( White Revolution ). डेअरी फार्मिंग, किंवा 'डेअरी इंडस्ट्री' किंवा 'दूध उद्योग' ही शेतीची एक श्रेणी आहे. हा पशुपालनाशी संबंधित एक अतिशय लोकप्रिय व्यवसाय आहे. ज्या अंतर्गत दूध उत्पादन, त्याची प्रक्रिया आणि किरकोळ विक्रीसाठी काम केले जाते.

मिल्क मॅन ऑफ इंडिया श्वेत क्रांतीचे जनक म्हणून डॉ. वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते( Verghese Kurien Father of the White Revolution). डॉ. वर्गीस कुरियन यांचा जन्म 26 नोव्हेंबर,1921 रोजी केरळमधील एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेतून मायदेशी परतल्यानंतर त्यांनी 1949 ला दूध उत्पादन क्षेत्रात सहभाग घेतला. त्यांच्यामुळे दुग्धव्यवसाय हा भारतातील सर्वात मोठा स्वावलंबी उद्योग बनला. त्यांनी सुमारे 30 संस्थांची स्थापना केली. ज्यात AMUL, GCMMF, IRMA, NDDB आदींचा समावेश आहे. डॉ. कुरियन यांना पद्मविभूषण भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान, जागतिक अन्न पुरस्कार आणि समुदाय नेतृत्वासाठी मॅगसेसे पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.9 सप्टेंबर 2012मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्याबद्दलच्या जाणून घेऊया या खास गोष्टी.

नॅशनल मिल्क डे देशात 'दुधाचा महापूर' योजनेची संकल्पना मांडणाऱ्या कुरीयन यांचा जन्मदिवस 'नॅशनल मिल्क डे' म्हणून साजरा केला जातो ( National Milk Day ). म्हणजेच 26 नोव्हेंबरला 'नॅशनल मिल्क डे' साजरा केला जातो. अमूलची एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी प्रमुख दूध उत्पादक देशांमध्ये गायीऐवजी म्हशीच्या दुधाची पावडर उपलब्ध करून दिली. अमूलचे "आनंद मॉडेल" देशभरात प्रचलित करून दिले. जगातील सहकार चळवळीचे सर्वात मोठे समर्थक डॉ. कुरियन यांनी केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांतील लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे.

दूध नावडता पदार्थ डॉ. कुरियन यांना दूध अजिबातच आवडत नव्हते. पण कालांतराने त्यांनीच दूध उत्पादनात क्षेत्रात मोलाचा वाटा उचलला. श्वेत क्रांती आधी भारतात. उपसमारी मोठ्या प्रमाणावर होती. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी ही पर्यत्न केले आणि देशात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले.

दूधाचा महापूर डॉ. कुरियन यांनी 1970 मध्ये ऑपरेशन फ्लड म्हणजेच दूधाचा महापूर ही योजना राबविली. त्यामुळे 13 जानेवारी 1970 रोजी देशात श्वेत क्रांतीला सुरूवात झाली. या योजनेमुळे भारतात श्वेत क्रांती संकल्पना उदयास आली आणि भारत जगात सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून उदयाला आला.

अमूलची स्थापना डेअरी प्रोडक्टमध्ये अग्रेसर असलेल्या अमूलची ( Amul ) स्थापना डॉ.कुरियन यांनी केली. अमूल, संस्कृत शब्द 'अमुल्य' या शब्दापासून बनलेला आहे. जी 1946 मध्ये भारतात स्थापन झाली. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केट फेडरेशन (GCMMF) या अन्य सर्वोत्कृष्ट सहकारी संस्थेच्या मालकीचा हा ब्रँड आहे. श्री त्रिभुवन दास यांनी डॉ. कुरियन यांच्यासमवेत गुजरातमधील खेडा जिल्ह्यात पहिली सहकारी संस्था स्थापन केली. देशातील पहिल्या सहकारी संघाची सुरुवात केवळ दोन गावांमध्ये सहकारी संस्थांनी झाली. आज GCMMF गुजरातच्या सुमारे 28 लाख दूध उत्पादकांच्या संयुक्त मालकीचे आहे. श्वेत क्रांती डेअरी बोर्डाचे मॉडेल अमूलच्या मॉडेलवर आधारित होते. NDDB ची संपूर्ण योजना या मंडळाच्या कामकाजावर आधारित होती. अमूलच्या यशाचे श्रेय संपूर्णपणे डॉ. कुरियन यांना जाते.

एनबीटीचे अध्यक्ष अमूलची लोकप्रियता बघून माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अमूलचा विस्तार करायचे ठरवले. त्यासाठी 1965 रोजी 'राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड'ची स्थापना केली आणि डॉ.कुरियन यांना त्या परिषदेचे अध्यक्ष बनवले.

'मंथन' चित्रपट श्याम बेनेगल यांनी डॉ.कुरियन यांच्या सहकार चळवळीवर अधारित 'मंथन' चित्रपट तयार केला होता. यात अनेक मोठ्या अभिनेत्यांनी काम केले होते. गिरीश कर्नाड, कुलभूषण खरबंदा, स्मिता पाटील, अमरीश पुरी, नसीरुद्दीन शाह अशा मोठ्या कलाकारांनी यात काम केले होते.

पुरस्कारांनी गौरव डॉ.कुरियन यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 30 हून अधिक संस्थाची स्थापना केली. रेमन मॅगसेसे, पद्मश्री, पद्मभूषण, पद्म विभूषणसारख्या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

मानद पदवी बहाल 1965 मध्ये मिशिगन विद्यापीठाने कुरियन यांना मानद पदवी बहाल केली.

हेही वाचा - Har Ghar Tiranga campaign kicks off today हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात देशभरात उत्साहाचे वातावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.