ETV Bharat / bharat

Criminal Procedure Identification Bill 2022 : गुन्हेगारीवरील विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांकडून टीकास्त्र - गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयकावर नवणीत राणा

गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयक (2022)सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. विरोधकांच्या टीका फेटाळून लावत गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयकाबात काळाची गरज असल्याचे म्हटले आहे. (Criminal Procedure Identification Bill 2022 ) आता हे विधेयक राज्यसभेत पाठवले जाणार आहे. दोषी किंवा आरोपी व्यक्तीच्या ओळखीसाठी जैविक नमुने, बोटांचे ठसे, पायाचे ठसे आणि इतर प्रकारचे नमुने घेण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Apr 5, 2022, 9:36 AM IST

दिल्ली - गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयक (2022)सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. विरोधकांच्या टीका फेटाळून लावत गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयकाबात काळाची गरज असल्याचे म्हटले आहे. आता हे विधेयक राज्यसभेत पाठवले जाणार आहे. दोषी किंवा आरोपी व्यक्तीच्या ओळखीसाठी जैविक नमुने, बोटांचे ठसे, पायाचे ठसे आणि इतर प्रकारचे नमुने घेण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.

अमरावतीच्या खासदार नवणीत राणा

विरोधकांकडून जोरदार टीका - यावर अमरावतीच्या खासदार नवणीत राणा यांनी आपले समर्थन दर्शवले आहे. तर, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी याला कडाडून विरोध दर्शवला आहे. (Criminal Procedure Identification Bill Passed ) दरम्यान, या विधेयकावर लोकसभेत जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी हे विधेयक मूलभूत हक्क आणि मानवी हक्कांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. हे विधेयक गोपनीयतेच्या अधिकाराच्या विरोधात असल्याचेही विरोधी पक्षाच्या खासदारांनी म्हटले आहे.

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील

विधेयकात काय तरतूद आहे? - कोणत्याही गुन्ह्याच्या आरोपाखाली दोषी किंवा अटक केलेल्या व्यक्तीच्या शरीराचे मोजमाप केले जाऊ शकते. मोजमापामध्ये व्यक्तीचे बोटांचे ठसे, पायाचे ठसे, आयरिश डोळ्याचा नमुना, त्याचे छायाचित्र, जैविक नमुना म्हणजेच रक्ताचा नमुना, त्याची स्वाक्षरी इत्यादींचा समावेश असेल. दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हे नमुने घेता येतील. पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल आणि वरच्या दर्जाचे पोलिस अधिकारी हे नमुने घेऊ शकतात. नमुन्यातून मिळालेला डेटा ठेवण्याची जबाबदारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची असेल.

हेही वाचा - इंधनाचे दर आज पुन्हा भडकले; परभणीत पेट्रोल 122.62, तर डिझेल 105.21 रुपये लिटर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.