सिद्धार्थनगर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे काही गुंड तरुणांनी बाटलीत लघुशंका केली आणि ती लघुशंका दोन मुलांना प्यायला लावली. त्यानंतर गुंडांनी मुलांच्या प्रायव्हेट पार्टवर पेट्रोल टाकून त्याला मिरची लावली. यानंतर या दोन मुलांना मारहाणही करण्यात आली. आता या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या आधारे पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली जात आहे.
अपशब्द वापरून मारहाण केली : हे प्रकरण सिद्धार्थनगर जिल्ह्यातील पाथरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये लहान मुलांना अमानुष वागणूक दिली जात असल्याचे दिसत आहे. काही गुंड तरुणांनी दोन मुलांशी गैरवर्तन केले. मुलांनी आधी बाटलीत लघुशंका केली आणि नंतर दोन्ही मुलांना ती पिण्यास सांगितले. त्यांनी याला नकार दिल्यानंतर त्यांना धमकावण्यात आले आणि अपशब्द वापरून मारहाण केली. यानंतर त्यांनी मुलांसोबत हे धक्कादायक कृत्य केले.
मुलांसोबत अनैतिक कृत्येही केली : या संपूर्ण घटनेतून एक बाब लक्षात येते आहे की या गुंडांना कायद्याचा बिलकुल धाक दिसत नव्हता. त्या दोन मुलांना लघुशंका पाजण्यास आणि मारहाण करण्यासोबतच या मुलांनी त्यांच्यासोबत अनैतिक कृत्येही केली. त्यांनी मुलांच्या प्रायव्हेट पार्टवर पेट्रोल टाकून मिरची लावली. या दरम्यान मुले ओरडत राहिली आणि दयेची याचना करत होती. मात्र, हे गुंड थांबले नाहीत. ते त्या दोघांसोबत अमानवी कृत्य करत राहिले.
सहा आरोपी ताब्यात : या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पाठवण्यात आले, असे एसपी अभिषेक कुमार अग्रवाल यांनी सांगितले. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे, असे एएसपी सिद्धार्थ यांनी सांगितले.
हे ही वाचा :