हैदराबाद - देशात कोरोनाची तिसरी लाट येत असताना दिलासादायक बातमी आहे. कोव्हॅक्सिनचा बुस्टर डोस ( COVAXIN booster dose benefits ) हा ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी असल्याची माहिती भारत बायोटेकने दिली आहे.
कोव्हॅक्सिनची लस डेल्टा व्हेरियंटवर 100 टक्के परिणामकारक ( COVAXIN effective against Delta variant ) आहे. तर ओमायक्रॉनवर 90 टक्के परिणामकारक असल्याचे कंपनीने म्हटले ( COVAXIN effective against Omicron variant ) आहे.
हेही वाचा-कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून चालू आठवड्यात मिळणार मान्यता
कोव्हॅक्सिन लशीमुळे डेल्टा व्हेरियंटचे विषाणू हे 100 टक्के निष्प्रभ असल्याचे दिसून आले. तर ओमायक्रॉनचे विषाणू हे 90 टक्के निष्प्रभ झाल्याचे दिसून आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाच्या विषाणुवर मोठ्या प्रमाणात परिणामकारक असल्याचे दिसून आले. कोरोनाचा विषाणू बदलत असताना कोव्हॅक्सिन हा चांगला पर्याय असल्याचे भारत बायोटेकने ट्विटमध्ये ( Bharat Biotech on effectiveness of COVXIN ) म्हटले आहे.
हेही वाचा-Vaccination : लवकरच लहान मुलांचे लसीकरण, 'या' वयाच्या मुलांना मिळणार लस
भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळवून तयार केली कोव्हॅक्सिन
12 वर्षे ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण देशात सुरू झाले आहे. देशाच्या औषध प्रशासन DGCI ने भारत बायोटेकला कोवॅक्सीन (Covaxin) 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना लसीकरण देण्यासाठी शिफारस केली होती. भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांनी मिळून ही लस विकसित केली आहे.