ETV Bharat / bharat

Shahjahan Urs Celebration Taj Mahal: ताजमहालमध्ये शाहजहानचा उर्स, शिवपार्वतीच बसले उपोषणाला, वाचा काय आहे प्रकार... - शाहजहानचा 368 वा उर्स

ताजमहालमध्ये होणाऱ्या सम्राट शाहजहानच्या 368 व्या उर्सपूर्वी वाद सुरू झाला आहे. गुरुवारी सकाळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाबाहेर पार्वतीच्या रुपात शिव उपोषणाला बसले. त्यांनी उपोषणाला बसल्याचे सांगताच जिल्हा प्रशासनातही खळबळ उडाली.

protest of Hindu Mahasbha in Agra opposing URS celebration of Shahjahan
ताजमहालमध्ये शाहजहानचा उर्स होणार साजरा.. हिंदू महासभेने केला विरोध
author img

By

Published : Feb 16, 2023, 2:14 PM IST

आग्रा (उत्तरप्रदेश): महाशिवरात्रीपूर्वी आग्रा येथील ताजमहालमध्ये पूजा-विधी करू देण्याची मागणी जोर धरू लागली. यासोबतच सम्राट शाहजहानचा ३६८ वा उर्स ताजमहालमध्ये साजरा करण्यास हिंदू महासभेने विरोध केला आहे. गुरुवारी, शिव-पार्वतीच्या गेटअपमधील लोक, हिंदू महासभेचे सदस्य, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) समोर निषेध नोंदवण्यासाठी धरणे धरत बसले आहेत. त्यामुळे आता यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

परवानगी नसताना साजरा होतो उर्स: सम्राट शाहजहानच्या 368 व्या उर्सला विरोध करण्यासाठी पार्वतीच्या रूपातील आंदोलक गुरुवारी सकाळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाबाहेर उपोषणाला बसले. शहाजहानचा उर्स ताजमहालमध्ये परवानगीशिवाय साजरा केला जात असल्याचा आरोप उपोषणाला बसलेल्या हिंदू महासभेच्या लोकांनी केला आहे. त्यामुळे आता पुरातत्त्व विभाग यावर काय निर्णय घेतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

शिवरात्रीला पूजेची परवानगी देण्याची मागणी: हिंदू महासभेचे सदस्य गुरुवारी उपोषणाला बसल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांची समजूत घालून त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला, पण शिव- पार्वतीच्या रूपातील आंदोलक धरणे आंदोलनातून हटले नाहीत. शाहजहानच्या उर्सला उत्सवाला कुठलीही परवानगी नसल्याचा दावा हिंदू महासभेने केला आहे. आग्र्यातील ताजमहाल हा प्रत्यक्षात तेजोमहालय असल्याने त्याला येत्या महाशिवरात्रीला याठिकाणी पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

१७ फेब्रुवारीपासून उर्स: मुघल सम्राट शाहजहाँचा ३६८ वा उर्स १७ फेब्रुवारीपासून साजरा होणार आहे. तीन दिवसीय उर्समध्ये ताजमहालच्या तळघरात असलेल्या मुघल सम्राट शाहजहान आणि मुमताज यांच्या कबर सामान्य पर्यटकांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत. यादरम्यान, शहाजहानच्या उर्सच्या निमित्ताने, आठवड्याच्या शेवटी ताजमहाल पाहण्यासाठी पर्यटकांना प्रवेश विनामूल्य ठेवण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.

उर्स समितीचा एएसआयशी पत्रव्यवहार: सम्राट शाहजहाँ उर्स उत्सव समितीने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या मुख्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. एएसआयने अद्याप याबाबत कोणताही आदेश जारी केलेला नाही. मात्र, दरवर्षी उर्सच्या निमित्ताने ही व्यवस्था केली जाते. सम्राट शाहजहान उर्स सेलिब्रेशन कमिटीचे अध्यक्ष सय्यद इब्राहिम हुसैन झैदी यांनी सांगितले की, सम्राट शाहजहानच्या ताजमहालमध्ये साजऱ्या होणाऱ्या ३६८व्या उर्सबाबत त्यांनी एएसआयशी पत्रव्यवहार केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सम्राट शाहजहानचा उर्स साजरा होणार आहे. उर्समुळे ताजमहालमध्ये यात्रेकरूंसह पर्यटकांना मोफत प्रवेश आहे. एएसआयच्या आदेशाची उर्स समितीला अद्याप प्रतीक्षा आहे.

हेही वाचा: Taj Mahal : ताजमहाल नव्हे हे तर प्राचीन शिवमंदिर.. बंद असलेले २२ दरवाजे उघडा : उच्च न्यायालयात याचिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.