ETV Bharat / bharat

congress president election : पक्षश्रेष्ठी नाराज, अशोक गेहलोत यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून वगळण्याची CWC ची मागणी ?

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी अशोक गेहलोत प्रकरणामुळे सर्वोच्च नेतृत्वाला मोठा झटका बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस कार्यकारी समिती ( CWC ) च्या सदस्यांनी गेहलोत यांना काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या ( congress president election ) शर्यतीतून वगळण्याची मागणी केली आहे.

congress president election
congress president election
author img

By

Published : Sep 26, 2022, 6:14 PM IST

Updated : Sep 26, 2022, 6:30 PM IST

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी अशोक गेहलोत प्रकरणामुळे सर्वोच्च नेतृत्वाला मोठा झटका बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस कार्यकारी समिती ( CWC ) च्या सदस्यांनी गेहलोत यांना काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या ( congress president election ) शर्यतीतून वगळण्याची मागणी केली आहे. त्यांची हकालपट्टी न केल्यास पक्ष नेतृत्वासमोर शिस्तीचा प्रश्न निर्माण होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या राजस्थान युनिटमध्ये सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे ( Senior Congress leader Mallikarjun Kharge ) आणि अजय माकन ( Senior Congress leader Ajay Maken ) या दोन्ही पक्ष निरीक्षकांनी सोमवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दोघे जयपूरहून थेट दिल्लीत पोहोचले आणि त्यानंतर 10 जनपथवर पोहोचून सोनियांची भेट घेतली.

राजस्थानमधील काँग्रेसच्या राजकीय गदारोळात पक्षाचे नेते केसी वेणुगोपाल यांनी दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भारत जोडो यात्रेतून त्यांना विशेषत्वाने बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरच ही बैठक झाल्याचे मानले जात आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे नेते अजय माकन हेही सोनिया गांधींना भेटायला आले होते. दोन्ही नेत्यांना निरीक्षक म्हणून राजस्थानला पाठवण्यात आले होते, त्यानंतर आज त्यांनी या बैठकीत राजस्थानबाबतचा अहवाल सादर केला आहे.

अशीही माहिती समोर येत आहे की, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे देखील सोनिया गांधींना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी येणार आहेत. यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. मात्र, अजय माकन यांनी गेहलोत यांची भेट घेतली नाही. गेहलोत गटावर पक्षाचे हायकमांड नाराज असल्याचे बोलले जात असताना ही बैठक झाली आहे.

गेहलोत यांची भेट घेतल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, काल घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही पक्षाध्यक्षांना माहिती दिली आहे. शेवटी जो निर्णय घ्यायचा तो प्रत्येकाने पाळायचा असतो, पक्षात शिस्त असायला हवी.

Last Updated : Sep 26, 2022, 6:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.